Thursday, June 30, 2022
No menu items!
Homeलाईफस्टाईलबॉलिवूडसोनाक्षी वर मलायकाचा ड्रेस चोरल्याचा आरोप, सोशल मीडियावर फोटो वायरल!

सोनाक्षी वर मलायकाचा ड्रेस चोरल्याचा आरोप, सोशल मीडियावर फोटो वायरल!

बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये नेहमीच फॅशनेबल आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी स्पर्धा सुरू असते. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांचेही आपापल्या आवडत्या सेलिब्रेटींकडे आणि त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असतं. अगदी कोणत्या इव्हेंटमध्ये त्यांनी कोणता ड्रेस घातला, तो ड्रेस कोणत्या रंगाचा होता इथंपासून ते तो ड्रेस परत कोणी वापरला आणि कोणी कोणाची कॉपी केली इथपर्यंत. या सगळ्याबाबत बॉलिवूड सेलेब्रेटींचे चाहते प्रचंड जागरुक असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच मग काहीवेळेस अभिनेत्री ट्रोल होतात. बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सोबत सुद्धा असंच काहीसं झालंय.

सोनाक्षी सिंह सध्या मलायका अरोराची कॉपी केली असल्याच्या कारणाने ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर सध्या मलायका आणि सोनाक्षीचे काही कोलाज फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोस मध्ये त्या दोघींनी एकसारखाच ड्रेस घातलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या 10 व्या वौग ब्यूटी अवॉर्डमध्ये मलायका अरोरानं व्हाइट डीप नेक ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिनं या अवॉर्ड शो मध्ये सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं.

नुकतेच सोनाक्षीनं तिच्या पर्सनल सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहिल्यावर नेटकरी चाहत्यांना मलायकाची आठवण झाली, कारण सोनाक्षीनं हुबेहूब मालयकासारखा ड्रेस घातला होता. पण असं असतानाही सोनाक्षी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे याबद्दल कुठलेही दुमत नाही.

सोनाक्षी आणि मलायकाच्या ड्रेसमध्ये जरी काही किरकोळ फरक सुद्धा आहेत, पण सोनाक्षीनं मलायकाप्रमाणं हॉट पोझ दिलेल्या नाहीत असे चाहत्यांचे म्हणणे आहे. मलायकानं तिच्या लुक मध्ये डार्क रेड लिपस्टिक लावली होती तर सोनाक्षीनं न्यूड कलरला प्राधान्य दिले होते. या दोघींचेही ड्रेस एकाच डिझायनरनं डिझाइन केल्याचं काही मीडिया रिपोर्टनुसार बोललं जात आहे. Kristian Aadnevik असं या डिझायनरचं नाव सांगितलं जात आहे.

सोनाक्षीनं आपल्या इन्स्टाग्रामवर या ड्रेसमधील काही फोटोस शेअर केल्यानंतर नेटकरींनी मात्र लगेच हा ड्रेस मलायकाच्या 10 व्या वौग ब्यूटी अवॉर्ड लुकची कॉपी असल्याचं ओळखलं आणि सोनाक्षीला कॉमेंट मध्ये ट्रोल करायला सुरुवात केली. “सोनाक्षी सिन्हानं मलायकाचा ड्रेस चोरला” असे काही जणांनी म्हटलं आहे. मलायका अरोरानं वोग अवॉर्ड शो ला घातलेल्या ड्रेस सारखा दिसणारा हा ड्रेस सोनाक्षीनं एका क्लोदिंग ब्रँडच्या इव्हेंटमध्ये घातला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments