Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबातम्यामराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर शांत आंदोलन पुढच्या वेळेस कसे...

मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर शांत आंदोलन पुढच्या वेळेस कसे रूप घेईल हे सांगता येणार नाही – मराठा तरुण

मराठा समाजाच्या असंतोषाकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, सकाल मराठा समाज मुंबई तर्फे आज मुंबई मध्ये बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक नेते आपापल्या परीनं आंदोलन करतायेत परंतु राज्य सरकार कडून प्रतिसाद मिळत नसल्याची मराठा बांधवांची भावना आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील एव्हरार्ड नगर जंकशन येथून बाईक रॅलीला सुरुवात होईल आणि त्यानंतर सायन – माटुंगा मार्गे जे जे पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला बाईक रॅली पोहोचेल. मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये एक नाराजीचे वातावरण होते, आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक मराठा बांधवांनी जमून मुंबई मध्ये बाईक रॅली चे आयोजन केले आहे.

मराठा समाजाच्या रॅली मध्ये सहभागी झालेले मराठा तरुण चेतन शेवाळे साम TV शी बोलताना म्हणाले “सरकारने ज्या पद्धतीने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्याचा आनंद आहेच परंतु याआधी सुद्धा सरकारने मागण्या मान्य केल्या होत्या परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज मूक आंदोलन करत आहेत, आणि आम्ही बाकीचे मराठा बांधाव त्यांना बाईक रॅली, संघर्ष मोर्चा मार्फत पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार वर जास्तीत जास्त सर्व दिशेने दबाव पडावा आणि मराठा समाजाच्या या प्रश्नांचा राज्य सरकारने लवकरात लवकर निकाल लावावा, यासाठीच या सर्व बाईक रॅली आणि आंदोलन आम्ही करत आहोत.”

“आजच्या बाईक रॅली मध्ये १५ ते २० हजार बाईक आणि मराठा बांधव जमलेले आहेत, गेल्या २ ते ३ महिन्यापासून या बाईक रॅली चे नियोजन सुरु होते जेणेकरून लोकडाऊन चे कारण देऊन राज्य सरकारने या रॅली मध्ये अडथळा तयार करू नये. यापुढे सुद्धा श्री नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मध्ये सुद्धा बाईक रॅली चे आयोजन होणार आहे आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा बांधा येथून सुद्धा पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत” असे सुद्धा साम TV शी बोलताना चेतन शेवाळे म्हणाले.

“मराठा समाज आता जागृत झालेला आहे, छत्रपतींपासून ते प्रत्येक आंदोलनाला मराठा समाज हा पाठिंबा देतोय, जर लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी नाही झाली तर हेच शांततेचे आंदोलन पुढे कोणत्या स्वरूपात जाईल हे सांगता येणार नाही.” – चेतन शेवाळे

आरक्षण रद्द झाल्यानंतर सुद्धा राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलले जात नसल्याने मराठा समाजामध्ये एक रागाची भावना आणि नाराजी दिसून येत आहे. याच सर्व मागण्यांकडे आणि मराठा आरक्षणाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठीच मराठा समाजाकडून बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments