Thursday, June 30, 2022
No menu items!
Homeक्रीडाक्रिकेटटी-२० वर्ल्ड कप युएईला शिफ्ट होणार: BCCI सचिव जय शाह, अंतिम निर्णय...

टी-२० वर्ल्ड कप युएईला शिफ्ट होणार: BCCI सचिव जय शाह, अंतिम निर्णय लवकरच घेऊ!

नवी दिल्ली, २ June जूनः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी शनिवारी म्हटले आहे की कोविड-१९ साथीच्या कारणास्तव टी -२० विश्वचषक भारत मधून युएईमध्ये (UAE) हलवावा लागेल.

“आपल्या देशातील कोविड-१९ ची परिस्थिती पाहता आम्ही स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरीत करू शकतो. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत, खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षितता सर्वोपरि आहे आम्ही लवकरच अंतिम निर्णय घेऊ” असे त्यांनी एएनआयला (ANI) सांगितले.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे 14 वे संस्करणही युएईमध्ये (UAE) पूर्ण होईल. आयपीएल १९ सप्टेंबरला सुरु होणार आहे आणि अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे.

याचा अर्थ असा होईल की टी-२० वर्ल्ड कपच्या अगदी आधी इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे सामने होतील आणि यावरून फ्रँचायझींना परदेशी खेळाडू उपलब्ध होतील की नाही यावर घाम फुटला आहे.

कोविड-१९ प्रोटोकॉलवर कडक नजर ठेवून काही फ्रॅन्चायझी त्यांच्या अधिकाऱ्यांना 6 जुलैनंतर युएईकडे पाठवण्याच्या योजना आखत आहेत, जेणेकरून त्यांना तिथे इंडियन प्रीमियर लीग साठी पूर्वतयारी करता येईल.

एएनआयशी बोलताना एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, युएईकडे जाणे महत्वाचे आहे कारण २०२० च्या आवृत्तीच्या तुलनेत परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि सीमा प्रवासासाठी खुल्या असल्या कारणाने बल्क बुकिंगसाठी सुद्धा समस्या उद्भवू शकते.

“एकदा आम्हाला बीसीसीआय व सरकारकडून मान्यता मिळाल्यावर आम्ही जुलै ६ नंतर युएईकडे जाण्याचा विचार करीत आहोत. जेणेकरून आम्ही लॉजिस्टिकल (खेळाडूंच्या प्रवासाची तयारी) सौदे सील करू शकू. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बल्क बुकिंग इतके सोपे असणार नाही, कारण सर्व देशातील लोक इतर देशात प्रवास करतील आणि बल्क बुकिंग करणे थोडे कठीण जाणार आहे” अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

क्रिकेट वेस्ट इंडीजचे अध्यक्ष रिकी स्कॅरीट यांनी यापूर्वीच याची पुष्टी केली आहे की सीडब्ल्यूआय (CWI), बीसीसीआय (BCCI) आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) सीपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या चर्चेत गुंतले आहेत जेणेकरून आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याला सामावून घेता येईल. मूळ सीपीएलची सुरुवात २ ऑगस्टपासून सुरू होणार होती, आता २६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान सेंट किट्स आणि नेव्हिस येथे खेळला जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments