Friday, July 1, 2022
No menu items!
Homeक्रीडाक्रिकेटBCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी-२० वर्ल्ड कपचे स्थान केले निश्चित: ICC...

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी-२० वर्ल्ड कपचे स्थान केले निश्चित: ICC ला निर्णयाबद्दल दिली माहिती

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत असा टी-२० वर्ल्ड कप २०२२ हा संयुक्त अरब एमिरेट (UAE) मध्ये होणार आहे. भारतातील कोरोनाच्या परिस्थीला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चतुर्भुज कार्यक्रम भारतातून युएईमध्ये हलविण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल औपचारिकपणे आयसीसीला (ICC) कळविले आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की साथीच्या आजारामुळे भारतात १६ संघांच्या स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होणार नाही.

टी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब एमिरेटमध्ये हलविला हलवावा याची अधिकृतपणे आयसीसीला माहिती आम्ही दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पीटीआयला सांगितले.या महिन्याच्या सुरूवातीला, आयसीसीने बीसीसीआयला २८ जूनपर्यंत मुदत दिली होती की, देशात हि शोपीस स्पर्धा घेण्याची सोय आहे की नाही याची माहिती द्यावी.

पण बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी सोमवारी सांगितले की, मंडळाला होस्टिंग हक्क मिळणार असले तरी आता १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान टी-२० वर्ल्ड कप हा भारतात अयीजीत न करता दुबई, अबू धाबी, शारजाह आणि मस्कट या चार शहरांमध्ये आयोजित केला जाईल.

“आपल्या देशात कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे आम्ही स्पर्धा युएईमध्ये बदलू शकतो. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत, खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे आम्ही लवकरच अंतिम निर्णय घेऊ” असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयला सांगितले होते.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगची १४ वे आवृत्तीही युएईमध्ये पूर्ण होईल. आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरला होणार आहे आणि अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. याचा अर्थ असा होतो की टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अगदी काही दिवस आधी IPL चे सामने संपुष्टीला येतील.

आणि यावरून फ्रँचायझींना परदेशी खेळाडू उपलब्ध होतील की नाही यावर घाम फुटला आहे. कोविड-१९ प्रोटोकॉलवर कडक नजर ठेवून काही फ्रॅन्चायझी त्यांच्या अधिकाऱ्यांना 6 जुलैनंतर युएईकडे पाठवण्याच्या योजना आखत आहेत, जेणेकरून त्यांना तिथे इंडियन प्रीमियर लीग साठी पूर्वतयारी करता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments