Saturday, June 25, 2022
No menu items!
Homeमनोरंजनव्हायरल व्हिडिओ: वरमाला सोहळ्यादरम्यान वधूला उचलणाऱ्याला नववधूने मारली कानशिलात, पुढे काय घडले...

व्हायरल व्हिडिओ: वरमाला सोहळ्यादरम्यान वधूला उचलणाऱ्याला नववधूने मारली कानशिलात, पुढे काय घडले बघून बसेल धक्का | पहा

देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे देशभरातल्या काही विवाहाच्या विचित्र घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्वांमध्ये, तरूण जोडप्याच्या जयमाला सोहळ्याचा एक जुना व्हिडिओ जवळजवळ तीन वर्षांनंतर पुन्हा व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे.

व्हायरल व्हिडिओत वधूने वरमाळा समारंभात आपल्या वराला पुष्पहार घालण्यासाठी उचलून धरलेल्या एका व्यक्तीच्या कानशिलात मारली होती. ज्ञानकुथू नावाच्या युसरने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता.

व्हिडिओमधील वधूने सुरुवातीला जेव्हा तिला वरमाळेची विधी पूर्ण करण्यासाठी उचलून धरण्यात आले तेव्हा परिस्थिती काही वेळ शांततेत हाताळली. परंतु वरमाळेची रसम पूर्ण झाल्यावर जेव्हा त्या इसमाने वाधुला खाली सोडले तेव्हा तिने ताबडतोब मागे वळून सणसणीत कानशिलात वाजवली.

एवढेच नाही तर विडिओचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे, वधूच्या हातून कानशिलात खाल्ल्यानंतर त्या संतप्त पुरुषाने आपला राग काढण्यासाठी दुसऱ्याच एका महिलेच्या कानशिलात मारली.

व्हायरल व्हिडिओत वधू आणि वर जयमालाच्या विधीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे. या विधी दरम्यान, मित्र आणि चुलतभावांनी वर आणि वधूला जितके शक्य असेल तितके वर उचलण्याची खोडी खेचणे सामान्य आहे जेणेकरून त्या जोडप्याला एकमेकांना हार घालणे कठीण होईल.

या लग्नाच्या वेळीही, वरच्या एका मित्राने हा धूम उचलला आणि उंची जुळण्यासाठी दुसरा माणूस आत आला आणि वधूला वर उचलले आणि जोडप्याने आपल्या माळांची देवाणघेवाण करण्यास यश मिळविले.

पण काही क्षणातच लग्नाच्या ठिकाणी परिस्थिती आंबट झाली. कदाचित वधूला परपुरुषाने अश्या प्रकारे उचलून धरलेले न आवडल्यामुळे तिने रंगाच्या भरात कानशिलात मारून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असावी.

भरलेल्या मंडपात झालेला अपमान सहन न झाल्यामुळे त्या पुरुषाने सुद्धा समोर असलेल्या दुसऱ्या महिलेला रंगाच्या भरात कानशिलात मारून लग्नाचा निरोप घेतला असावा.

या विडिओ वर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments