Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeबातम्याजळगाव: छत्रपती मराठा साम्राज्य संघटने तर्फे एसटी कर्मचाऱ्यांचा फुल गुच्छ व अल्पोपहार...

जळगाव: छत्रपती मराठा साम्राज्य संघटने तर्फे एसटी कर्मचाऱ्यांचा फुल गुच्छ व अल्पोपहार देऊन सत्कार

आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला सेवा देणाऱ्या चालक वाहक व मॅकेनिक बांधवांचा सत्काराचा कार्यक्रम आज छत्रपती मराठा साम्राज्य संघटने तर्फे पार पडला. एसटी कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या जनतेस अगदी कोरोना काळात देखील सुरक्षित प्रवास करण्याची संधी मिळालेली असल्याने CMS तर्फे आज दिनांक २७ जून २०२१ रोजी जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांचा फुल गुच्छ / हार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचाऱ्यांना अल्पोपहार (पोहे-जलेबी) चे देखील वाटप करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपती मराठा साम्राज्य संघटने तर्फे श्री. जितेंद्र पवार, श्री संतोष पाटील, श्री. सुर्यकांत गावंडे, श्री गोपाल पाटील, श्री नरेंद्रसिंग राजपूत, श्री दिनेश महाशब्दे, श्री निलेश पाटील (आगार व्यवस्थापक) श्री. दीपक चव्हाण, श्री. उदयराम पाटील, प्रशांत पाटील, पंकज पाटील सह इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोपाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिनेश महाशब्दे यांनी केले.

एसटी कर्मचारी दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करत असतात, अगदी दरवर्षी सणावाराला सुद्धा ते सुट्टीवर न जाता आपल्या परिवारापासून दूर आपल्या सेवेसाठी उपस्तित असतात. परंतु त्यांचे कौतुक फार कमीच होते, एसटी कर्मचाऱ्यांना “हिरोस इन डीसगाईस” म्हणजेच भेस बदलून आलेले नायक असेच म्हणायला हवे.

छत्रपती मराठा साम्राज्य संघटने तर्फे त्यांच्या कार्याचे कधीनव्हे ते कौतुक करण्यात आल्यामुळे एसटी कर्मचारी हर्षोल्लित झाल्याचे आगर व्यवस्थापक श्री. निलेश पाटील यांनी युनायटेड महाराष्ट्राच्या पत्रकारांना सांगितले.

अशाचप्रकारे सर्वांनी पुढे येऊन जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे छोटे का होईना परंतु कौतुक केलेच पाहिजे. छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेला युनायटेड महाराष्ट्राचा सलाम.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments