मुंबई – कोरोनव्हायरसची दुसरी लाट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने मंगळवारी रात्री गणेशोत्सव, इतर सार्वजनिक समारंभांवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आणि अधिकार्यांना सार्वजनिक मूर्तींची जास्तीत उंची चार फूट आणि घरगुती मूर्ती दोन फुटांवर ठेवण्यास सांगितले. आणि कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान गणेशोत्सव यावर्षी सुद्धा सोप्या पद्धतीने साजरे करा अश्या सूचना सुद्धा दिल्या.
स्थानिक प्रशासनाच्या धोरणाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनी योग्य खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने सांगितले.
राज्यात सर्वाधिक लोकप्रसिद्धी उत्सुकता असलेला हा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोना व्हायरसचा उद्रेक आणि सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे यापैकी बराचसा भाग वधला जाईल, असे पुण्यात अधिऱ्यांनी सांगितले.
सरकारचे पत्र १० दिवसीय उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या शेवटच्या दिवसाचे मार्गदर्शकतत्त्वे देते. दहा दिवसांच्या उत्सवात दररोजच्या प्रार्थना अर्चना आणि देवाचे “दर्शन” ऑनलाईन करावेत, मंडळाजवळ गर्दी टाळावी अश्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहे.
पारंपारिक प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक वस्तूंपासून मूर्ती घरीच तयार करुन पर्यावरणास अनुकूल मूर्तींचे विसर्जन करण्याची विनंती भाविकांना केली आहे. नागरी संस्थांना विसर्जनासाठी कृत्रिम टाक्या व तलावांची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव मंडळांना स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांनी रक्तदान शिबीर आणि सामाजिक जागरूकता शिबिरे घ्यावीत आणि उत्सवस्थानावर भजन-कीर्तन व इतर सामूहिक कार्यक्रम टाळावेत.
राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांवर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.