Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेकोविड योद्धा: या महामारीच्या काळात जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्यच -...

कोविड योद्धा: या महामारीच्या काळात जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्यच – विजय पवार

संपूर्ण भारत आणि जग करोना संकटाचा सामना करत असतांना, प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी वाटत आहे, पण यात पोलीस ,आरोग्य सेवक तसेच काही स्वतंत्र समाज सेवक कोविड योद्धे बनून निस्वार्थ पणे जनतेची सेवा करत आहेत.

त्यापैकीच एक नाव म्हणजे पुणे शहरातील विजय पवार! समाजातील काही तरुण आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन सकल मराठा वैद्यकीय परिवार या ग्रुप ची स्थापना केली गेली जेणेकरून होतकरू आणि इच्छुक तरुण आपापल्या परीने लोकांची शक्य ती मदत करू शकतील. प्राथमिक सदस्यांमध्ये विजय पवार व त्यांची सामाजिक संस्था युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन (UMO) सुद्धा शामिल होते.

गेले १ ते दीड वर्षापासुन सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे लोकांची परिस्थिती अगदी हलाखीची होत होती, शहरबंदी, नाकाबंदी आणि इतर निर्बंधांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांच्या मदतीला येणे अवघड झाले होते. या परिस्थितीला पाहता विजय पवार यांनी स्वताला कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी झोकून दिले.

२४ तास अत्यावश्यक सेवा ते सकल मराठा वैद्यकीय परिवारामार्फत पुण्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी कोविड योद्धे तयार करून पुरवत आहेत. गरीब कुटुंबांना किराणा माल उपलब्ध करून देणे, हॉस्पिटलच्या आलेले अवाढव्य बिलामध्ये सवलत मिळवून देणे, रक्तदान शिबीर, प्लास्मा दान शिबीर आयोजित करणे, अश्या विविध उपक्रमांमार्फत विजय पवार सकल मराठा वैद्यकीय परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मदतीचा हात देत आहेत.

“कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात माझा वा माझ्या परिवाराचा खारीचा वाटा म्हणून हे कर्तव्य मी करीत आहे.” असे विजय पवार यांनी युनायटेड महाराष्ट्राच्या पत्रकारांना सांगितले. तसेच जनते मधून माणुसकी या नात्याने रुग्णांची मदत करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे यावे असे आव्हानही त्यांनी समाजातील तरुणांना केले आहे.

या कठीण काळात निस्वार्थ मदत करणाऱ्या अश्या कोरोना वॉररिअर्स ना युनायटेड महाराष्ट्र टीम कडून सलाम.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments