मुंबईः सुप्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. राज हे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते, वयाच्या ४९ व्या वर्षी मुंबई मध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. छायाचित्रांमधे मंदिरा बेदी त्यांच्या पतीला शेवटचा सन्मान देताना दिसल्या व सर्व अंत्यविधी सुद्धा त्यांनी स्वतः पार पाडले.
पारंपारिकरित्या, एखाद्या महिलेने तिरडीला स्पर्श करणे किंवा स्मशानभूमीत नेणे अपेक्षित नसते. स्वत:चे नियम तयार करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेल्या मंदिराने पती राज यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा जुन्या रूढी मोडून स्वतः तिरडी नेली आणि स्वतःच्या पद्धतीने पतीचा शेवटचा निरोप घेतला. ती प्रचंड दुःखात असून सुद्धा खंबीरपणे आपल्या नवर्याच्या सोबत त्याच्या शेवटच्या प्रवासात थांबली आणि अंत्यसंस्कार स्वतः पूर्ण केले.
मंदिरा बेदीचा मित्रपरिवार तिच्या या दुःखात तिच्यासोबत
आशिष चौधरी, रोनित रॉय, अपूर्व अग्निहोत्री, हुमा कुरेशी आणि इतरांनी तिच्या घराबाहेर रांगेत उभे राहून तिचे सांत्वन केले. या दुःखाच्या परिस्थिती मध्ये मित्रांची साठी आणि सहकार्य बहुमूल्य असते याची जाणीव असल्यामुळे सर्व मित्रपरिवाराने थेथे उपस्तिती दाखवली.
पती राज यांच्या अंत्यसंसारामध्ये मंदिर बेदी अत्यंत दुःखात
मंदिरा आणि राज यांचे १९९९ मध्ये लग्न झाले. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेतले आणि तिचे नाव तारा बेदी कौशल असे ठेवले. त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी, राज यांनी मौनी रॉय आणि त्यांच्या इतर मित्रांसह त्यांच्या निवासस्थानी काही काळ घालवला. मंदिरा आणि मौनी या दोघींनीही रविवारी पुन्हा एकत्रित छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.
मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांना तिचा अखेरचा अश्रूमय निरोप!
बेदी आणि कौशल कुटुंबांसाठी ही कठीण वेळ आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!