पुणे: सायबर फसवणूकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सायबर फसवणूकीबद्दल नेटिझन्सना सतर्क करण्यासाठी पुणे पोलिसांनी गँग्स ऑफ वासेपुर मेमचा वापर करून एक विनोदी संदेश दिला आहे. पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलने लोकांना रमडेसीव्हिर आणि मुकोरमयकॉसिस औषधे विकण्याचा दावा करणाऱ्या असत्यापित नंबरवर कॉल करणे थांबवण्याचा इशारा दिला.
एका ट्वीटमध्ये पुणे पोलिसांनी लिहिले आहे की, “जर तुम्हाला ‘डेफिनेट’ #सायबर #फ्रॉडचा पाठलाग करायचा नसेल तर रमडेसीव्हिर आणि मुकोरमयकॉसिस औषधे पुरवण्याचा दावा करणार्या असत्यापित नंबरवर कॉल करणे थांबवा!”
पोस्टमध्ये पुणे पोलिसांनी पुढील हॅशटॅग्स चा वापर सुद्धा केला #CyberFraudKoPermissionDiyaKya #CyberSecurity #GangsOfWasseypur .
पुणे पोलिसांच्या या विनोदी पद्धतीला नेहमीच चांगली प्रतिक्रिया मिळते असे दिसते, आणि याने पुणे पोलीस व नागरिकांचे संबंध सुद्धा चांगले होताना दिसत आहेत. पुणे पोलिसांचे हे ट्विट सुद्धा व्हायरल होत आहे आणि लोक त्या विचित्र/विनोदी संदेशाला खूप पसंती आहेत.
रेमडेसिव्हिर हे अँटीव्हायरल औषध कोविडच्या रूग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येत होते, आणि कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक मार्केटिंग आणि आवश्यक औषधाच्या होर्डिंगसाठी या औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आढळला आहे.