Friday, July 1, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेसारथी संस्थेच्या संचालक पदी श्री.राजन घाग यांची निवड करण्यात यावी - मराठा...

सारथी संस्थेच्या संचालक पदी श्री.राजन घाग यांची निवड करण्यात यावी – मराठा तरुणांकडून मागणी

विद्यार्थ्यांसाठी संवाद सूचना कोशल्य, आत्मविश्वास वृद्धी,व्यवसाय मार्गदर्शन व इतर काही विविध कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा ,राज्यातील शेतजमिनीच्या संवर्धन व संधारणासाठी माहिती व शिक्षणासाठी जमीनदल तयार करण्याचे कामही सारथी मार्फत होते. सारथी ही संस्था प्रामुख्याने मराठा, कुणबी, कुणबी मराठा कुटुंबाच्या सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास समजून त्यावर उपाययोजना तयार करण्यासाठी बनविण्यात आलेली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी ही कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉट फॉर प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे.

सध्या सारथीच्या संचालक पद साठी कोणाची नेमणूक होणार यावर मराठा समाजाचे बारीक लक्ष टिकून आहे. त्यामुळेच संचालक पदासाठी विविध मान्यवरांचे नाव समोर येत असताना मराठा तरुणांकडून आता श्री.राजन घाग यांना पसंती दर्शविण्यात येत आहे. व हळू हळू तरुणांमध्ये ही मागणी जोर धरताना दिसून येत आहे.

सारथी संचालक हा मराठा समाजाचाच असावा, तसेच फक्त आरक्षण हाच मुद्दा ना धरता समाजाचे असलेले इतर मुद्दे व समाजावर होणारा अन्याय कडे लक्ष देणारा एक लढवैय्या अभ्यासू सक्षम तरुण संचालक असावा अशी मागणी मराठा समाजाच्या तरुणांकडून होत आहे.

मराठा समाजातील बऱ्याच तरुणांनी याविषयी ट्विटर वर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदविल्या त्यापैकी चेतन शेवाळे या मराठा तरुणाने ट्विट मार्फत त्यांची प्रतिक्रिया नोंदविली. ते म्हणाले “सारथी चे संचालक म्हणून समाजाची कामे करणारा ग्राउंड वर उभा असणारा व्यक्ती हवा,,जो समाजाच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल, तसेच तरुण व अभ्यासू असावा व माझ्या वैयक्तिक दृष्ट्या श्री.राजन घाग हे उत्तम पर्याय आहे आणि त्यांना तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करतो” आणि त्यांनी युवराज संभाजी राजे यांना सुद्धा त्यांच्या ट्विट मध्ये टॅग केले.

राजन घाग यांनी समाजासाठी आंदोलन असो किंवा तांबडी बलात्कार प्रकरणात झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठविणे, तळागाळात पोहचून तरुणांना योग्य पद्धतीत मार्गदर्शन करणे आणि समाजासाठी तत्पर असल्यामुळे समाजातील विशेषतः तरुण वर्ग त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊन आहे. त्यामुळेच सारथी संस्थेच्या संचालक पदासाठी मराठा तरुणांकडून राजन घाग यांनी पसंती पाहायला मिळत आहे.

मराठा तरुणांच्या या मागणीचा सरकार किती गांभीर्याने विचार करते हे बघणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments