Thursday, August 18, 2022
No menu items!
Homeबातम्याझोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रसाद प्रजापत यांचे आगळे वेगळे आंदोलन

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रसाद प्रजापत यांचे आगळे वेगळे आंदोलन

आजकाल आपण बघतो की आंदोलनाचे स्वरूप हे मोर्चे, ठिय्या आंदोलन, आक्रमक आंदोलन, उपोषण असे असते.

पण या सर्व आंदोलन स्वरूपांच्या व्यतिरिक्त चांदवड येथील रहिवासी प्रसाद प्रजापत यांनी एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन हाती घेऊन प्रशासनास जमिनीवर येण्यास भाग पाडले.

सविस्तर वृतांत असा की चांदवड मधील फुलेनगर येथे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सोसावा लागत होता. सध्याच्या महामारीच्या परिस्थिती मध्ये स्वच्छता हि एक खूप महत्वाची बाब झाली आहे आणि अश्यात साठलेला कचरा हा आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो हे प्रसाद प्रजापत यांच्या लक्षात आले होते.

वेळोवेळी प्रसाद प्रजापत यांनी नगरपरिषद मध्ये निवेदन देऊनही प्रशासन याबाबत दखल घेत नव्हते. शेवटी नाईलाजास्तव त्यांनी एक बॅनर बनवून नागरपरिषदेला एक इशारा दिला की “सदरील कचरा (मिळकियत) हा चांदवड नगरपरिषदेची जबाबदारी असून यास वेळोवेळी हा कचरा उचलण्यास सांगूनही पण तो आज रोजी ०४/०७/२०२१ पर्यंत येथेच पडलेला आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. तरी येथील कचरा त्वरित न उचलल्यास हा कचरा नगरपरिषदेच्या आवारात टाकण्यात येईल.”

त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने नगरपरिषद खडबडून जागी झाली आणि तात्काळ तो कचरा हटविण्यात आला. यासाठी समस्थ फुले नगर वासीयांनी त्यांचे आभार मानले.

अश्याप्रकारे नागरिकांना जागे होणे आजच्या घडीला अत्यावश्यक झाले आहे. आणि अश्याच जागरूक नागरिकांमुळे काही ठिकाणी झोपलेल्या प्रशासनाला सुद्धा जाग येत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments