Sunday, June 26, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेजकात टोलची वसुली आणि नागरिकांसोबत होणारे गैरवर्तन कधी थांबणार?

जकात टोलची वसुली आणि नागरिकांसोबत होणारे गैरवर्तन कधी थांबणार?

पुणे (Pune): देशात जीएसटी (GST) लागू होताच पुण्याच्या वाहन कन्टेनमेंट जकात टोल (Cantonment Toll) बंद झाला होता. परंतु हा निर्णय केवळ तात्पुरता ठरला असे सांगण्यात काहीही हरकत नाही. एक देश एक कर हे म्हणून देशात जीएसटी लागू करण्यात आला परंतु असे असतान पुण्यातील कॉन्टेनमेंट (Cantonment tax toll) टोल त्याला अपवाद ठरला.

टोल बंद झाल्याने पुणे शहरातील व पुणे बाहेरील वाहनानस काहीसा दिलासा मिळाला होता परंतु ३१ जुलै २०१७ पासून पुन्हा कर वसुली चालुकरण्यात आली. हा कर अवैध्य व जुलमीचा आहे सांगून काही सामाजिक संस्थेनी हा कर बंद करण्याची मागणीही केली होती परंतु यावर काहीही झाले नाही.

खरतर हा कर व्यावसायिक वाहनानकरीता आकारण्यात येतो रिक्षा टॅक्सी टॅम्पो अशा सर्व प्रकारच्या वाहनांनस लागू होतो परंतु ह्या कराची रक्कम ही सर्वसामान्य पुणेकरांना व पुणे बाहेरील लोकांनच्या खिशालाच कात्री बसत आहे.

रिक्षा, टॅक्सी हा कर सर्वसामान्य लोक जे त्या वाहना मधुन प्रवास करतात त्यांनाच हा अधिकचा कर गाडी भाड्यात जोडून द्यावा लागतो. मग हि सर्वसामान्य नागरिकांनीच पुलावणूक नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

अशातच काही पुणे बाहेरील गाड्या किंवा एखादे नविन वाहक त्या मार्गाने प्रवास करीत असताना त्यांस या कराची कल्पना नसल्याने टोल बुथच्या पुढे निघुन जातात. हे पाहून तेथील कर्मचारी त्या गाडीच्या पाठीमागे येवून गाडी थांबवून वाहकास अवाच्छ भाषेत शिविगाळ व दमदाटी करून कर व अतिरीक्त पैसे ऊगळतात मग त्या वाहनात महिला असो कि लहान मुले ते न पाहता अरेरावीची भाषाचा प्रयोग करतात (misbehavior with citizens by Cantonment Toll collectors).

https://www.complaintboard.in/complaints-reviews/pune-cantonment-board-l120878.html या वेबसाईट वर शेकडोच्या संख्येने नागरिकांनी तक्रारी (cantonment complaints) नोंदविल्या आहेत परंतु त्याची सुद्धा दखल घेतलेली नाही असे समजते.

२०१७ मध्ये सुद्धा काही नागरिकांनी यावर आवाज उठवायचा प्रयत्न केला होता, त्यापैकी एका नागरिकाचा ट्विट:

कायद्यानुसार वाहनाला शिट्टी वाजवून थांबविणे हे त्यांचे काम आहे, तरीसुद्धा या कायद्याला पायदळी तुडवत गुंड प्रवृत्तीने नागरिकांना धमक्या देऊन पैसे लुबाडले जात आहेत हे अतिशय निराशाजनक आहे. या जकातनाक्यावर कुठल्याही प्रकारचे वेगळे ठळक बोर्ड किंवा लाईट नसतात जेणेकरून वाहन चालकांना ते स्पष्टपणे पाहता येतील.

याआधी विविध टॅक्सी चालकांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांनकडे या विषयी तक्रार सुद्धा केली आहे, परंतु त्या तक्रारीची गांभीर्याने कोणीही दाखल घेतली नाही असे जाणवते. सर्वसामान्यांना होणारा हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे आणि चुकीची वर्तवणूक करणाऱ्या जकात वसुली पथकावर कारवाई झाली पाहिजे.

परंतु यावर आवाज उठवणार कोण? हाच मोठा प्रश्न आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments