नवी दिल्ली: सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक अस्थैर्यामुळे आपण चिंतेत असाल तर आजच तुम्हाला गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अटल पेन्शन योजना (APY) ही एक लोकप्रिय योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळविण्यासाठी आपल्याला दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
अटल पेन्शन योजनेबद्द्दल काही महत्वाची माहिती
- अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत प्रत्येक महिन्याला किमान रू १००० ते रू ५००० पर्यंतची मासिक पेन्शन मिळण्याची हमी आहे.
- केंद्र सरकार किमान पेन्शनच्या लाभाची हमी देते.
- केंद्र सरकारही प्रति वर्ष १००० किंवा ग्राहकांच्या योगदानाच्या ५०% टक्के यापैकी जे कमी असेल ते सहकार्याने योगदान देते.
- विशेष म्हणजे ज्यांचा कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समावेश नाही आणि आयकर भरणा हि नाही अशा नागरिकांसाठीच शासकीय सहकार्य उपलब्ध आहे.
- १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतातील सर्व नागरिक अटल पेन्शन योजनेचे सदस्य होण्यासाठी पात्र आहेत.
- सर्व बँक खातेदार एपीवाय (APY) मध्ये सामील होऊ शकतात.
- प्रवेशाचे वय १८ वर्षे असल्यास, व्यक्तीस १००० रुपये मासिक पेन्शन मिळविण्यासाठी ४२ रुपये मासिक योगदान देणे आवश्यक आहे. २००० रुपये मासिक पेन्शनसाठी ८४ रुपये प्रतिमाह योगदान, महिन्याला १२६ रुपये योगदान रुपये ३००० मासिक पेन्शन साठी, रुपये ४००० मासिक पेन्शनसाठी महिन्याला १८८ रुपये आणि ५००० रुपये मासिक पेन्शनसाठी २१० रुपये दरमहा योगदान देणे आवश्यक आहे.
- याचा अर्थ, तुम्ही प्रतिदिवस फक्त ७ रुपये (प्रतिमाह २१० रुपये) जमा करून ५००० रुपये प्रतिमाह म्हणजेच ६०,००० रुपये प्रतिवर्ष पेन्शन मिळवू शकतात.
योगदानाच्या रकमेची देयके बंद केल्याने पुढील गोष्टी घडू शकतात:
- ६ सहा महिन्यांनंतर अटल पेन्शन योजनेचे खाते गोठवले जाईल.
- १२ महिन्यांनंतर एपीवाय (APY) खाते निष्क्रिय केले जाईल.
- २४ महिन्यांनंतर अटल पेन्शन योजना खाते बंद होईल.
म्हणूनच, अटल निवृत्तीवेतन योजनेच्या सदस्यांनी हे निश्चित केले पाहिजे की योगदानाच्या रकमेच्या ऑटो डेबिटसाठी बँक खात्यास पुरेसे वित्तपुरवठा होईल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.