Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबातम्याहैदराबाद मधील ७० वर्षीय वृद्ध सायकल वरून लोकांची करत आहेत मदत: वाचा...

हैदराबाद मधील ७० वर्षीय वृद्ध सायकल वरून लोकांची करत आहेत मदत: वाचा सविस्तर वृत्त

हैदराबाद (Hyderabad) : हैदराबादचे ७० वर्षीय व्यक्ती खासकरून कोव्हीड महामारीच्या (Covid 19 pandemic in India) वेळी गरजू लोकांना मदत करण्यासाठी सायकलवरून जात आहेत. एअर इंडियाचे (air India) सेवानिवृत्त कर्मचारी के आर श्रीनिवास राव (Shrinivas Rao) म्हणाले की, त्यांना नेहमीच गरजू लोकांची सेवा करायची होती आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली.

सायकल चालवण्याच्या तीव्र आवेशाने आणि गरजूंना मदत करण्याची आकांक्षा असल्यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही आवडींना जोडण्यासाठी व्यासपीठ मिळालं, अशी माहिती एअर इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्याने दिली.

“जेव्हा कोविड -१९ ची प्रकरणे शिखरावर होती, तेव्हा मी हैदराबादस्थित एका हैदराबाद-रिलीफ रायडर्स या संस्थेत सामील झालो. त्यांचे उद्दीष्ट सायकल चालविण्याविषयी जागरूकता आणणे होते. आणि कोरोना महामारीच्या दरम्यान, संस्थेने गरीब व गरजू लोकांना त्यांच्या अत्यावश्यक गरज जसे किराणा किंवा औषधी दारोदारी सायकल वरून पोहोचवून मदत केली.” असे श्रीनिवास म्हणाले.

सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी श्रीनिवास यांनी टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. आणि आपल्या निवासस्थानाजवळ सायकल चालवण्याची

सुद्धा सवय लावली आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. श्रीनिवास यांनी सर्वांना असा सल्ला दिला की लोकांनी पुढे येऊन गरजूंना शक्य तेवढी आणि शक्य त्या पद्धतीने मदत केली पाहिजे. ते म्हणाले, पर्यावरणाच्या संकटाची बाब लक्षात घेऊन लोकांनी छोट्या अंतरांसाठी अंतरासाठी सायकल वापरण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments