Friday, July 23, 2021
No menu items!
Homeमाहितीया वनस्पतींना आहे स्वतःचा मेंदू, जिवंत कीटक आणि पक्षी खाऊन भारतात पोट:...

या वनस्पतींना आहे स्वतःचा मेंदू, जिवंत कीटक आणि पक्षी खाऊन भारतात पोट: वाचा सविस्तर माहिती

झाडे हि निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अमूल्य भेट आहेत, म्हणून आपण सर्वानी झाडांचे संरक्षण करने हे आपले कर्तव्य समजायला हवे. आजच्या या लेखात आपण दुर्लभ अश्या काही वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती घेणार आहोत. जगात अश्या अनेक वनस्पती आहेत की ते त्यांना लागणारे अन्नद्रवे व जगण्यासाठी किटकांची शिकार करून मोठे होतात. थोडक्यात आपण त्यांना मांसाहीरी वनस्पती (carnivorous plants) सुद्धा म्हणू शकतो.

यातील काही वनस्पती अशा आहेत की त्या दिसायला खुप सुंदर व आकर्षक आहेत परंतु ते जितके सुंदर आहेत तितके भयंकर आणी शिकारी (carnivorous) सुद्धा आहेत. अशा जगात ६०० पेक्षा अधिक प्रजाती उपलब्ध आहेत त्यातुनच आम्ही आपणांस काही अशा अद्वितीय आणी प्रसिद्ध वनस्पतींची थोडक्यात माहिती देणार आहोत.

ट्रॉपिकल पिचर – नेपेंथेस (मंकी कॅप) Tropical Pitcher Plant – Nepenthes (Monkey Cap)

ट्रॉपिकल पिचर – नेपेंथेस (मंकी कॅप) Tropical Pitcher Plant – Nepenthes (Monkey Cap)

या वनस्पतीचा आकार हा कॅप सारखा म्हणजेच मडक्या सारखा असतो. काही वेळेस यातून माकडे पाणी पिण्यासाठी येतात म्हणुन यांस मंकी कॅप किंवा ट्रॉपिकल पिक्चर प्लॉन्ट सुद्धा म्हटले जाते. ही वनस्पती भारताच्या उष्ण कटिबंद ठिकाणी आढळी जाते. तसेच भारता बाहेर चीन, इंडोनेशिया, फिलीपन्स, मलेशिया अशा ठिकाणी सुद्धा ही वनस्पती आढळते. हिचा आकार हा मडक्या सारखा किंवा वेलवर्गीय सुद्धा असतो. मुख्यत्वः ही वनस्पती दलदलीच्या ठिकाणी किंवा खारट जागेत आढळून येते. याचे हिंदी नाव घट पर्णी सुद्धा आहे. हे किटक खाणारी वनस्पती (carnivorous plant) नुसते किटकच नाही तर बेडुक, पाली, उंदीर अशा अनेक प्रकारचे छोटे जीव सुद्धा खाते.

परंतु तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हि वनस्पती शिकार तरी कसे करते. याच्या मडक्या सारख्या आकार मध्ये काही ग्रंथी असतात त्या ग्रंथी द्रव पदार्थ निर्माण करतात आणि ह्या पदार्थांमुळे काही किटक आकर्षित होतात. अश्याने किटक ८ ते ९ सेटिंमिटर घसरून आत पडतात, आणि आत पडल्यानंतर त्याना बाहेर पडता येत नाही. अशात हि वनस्पती ह्या कीटकांना पचवून त्यातून काही पोक्षक तत्व घेऊन जगतात.

कॉर्कस्क्रेव प्लांट – जेनलिसिया / Corkscrew Plant – Genlisea

कॉर्कस्क्रेव प्लांट – जेनलिसिया / Corkscrew Plant – Genlisea

ही वनस्पती जिथे जास्त आदरता असते अशा ठिकाणी आढळते. उदाहरण म्हणजे मध्य आफ्रिका व दक्षिणी अमेरिका अशा ठिकाणी हि मांसाहारी वनस्पती आढळून येते. जेनलिसिया हि पिवळ्या फुलांसारखी दिसणारी एक गवता सारखी वनस्पती (grass like plant) आहे. यात दोन वेगवेगळी पाने पाहायला मिळतात, एक जमिनीवर जे आपणांस डोळ्याने पाहता येते (visible to eyes) आणी एक जमीनी खाली. जमिनीच्या खाली असणारी पाने ही त्यांच्या मुळांप्रमाणे काम करतात.

ही पाने पाण्याला शोषण्याचे काम करतात आणि ते करत असताना ही पाने किटकांना त्यांच्या कडे आकर्षित करण्याचे काम सुद्धा करतात. जर एखादा किटक ह्यात गुंतला तर त्याला बाहेर पडता येत नाही. आणी ही वनस्पती त्या किटकास खाऊन टाकते. याची खालील पाने ही सापा सारखी आकृतीची असतात त्यातल्या पाण्याच्या प्रवाहामुळे किटकास बाहेर पडता येत नाही. बाहेर येतात ते फक्त त्या जिवाचे अवशेष.

सारासेनिया / Sarracenia

सारासेनिया / Sarracenia

निपेन्थिस सारखांच हा ही एक शिकारी वनस्पती (carnivorous plant) आहे. ही वनस्पती उत्तरी आणि पूर्व अमेरिका मध्ये दलदलीच्या ठिकाणी आढळते. आकारही निपेन्थिस सारखांच असतो याच्या खालच्या बाजुच्या भागात एक विषिष्ट असा गोड द्रव बनतो आणी याच्या अशा गोड द्रवामुळे किटक आकर्षित होऊन वरच्या बाजूने आत प्रवेश करतात.

आत प्रवेश केल्यानंतर आतल्या गुळगुळीत पनामुळे घसरून खाली त्या द्रवा मध्ये पडतात. ह्या वनस्पतीच्या वरच्या भागावर एक टोपीच्या आकाराचे फुल असते हे फुल पावसाचे पानी आत जाण्यापासून अडवते. ह्यात असणारे तरलपदार्थ किटकांना मारून त्यातील पोषक तत्व जसे कॅलशियम, मॅग्नेशियम पिऊन घेतात.

ड्रोसेरा / Drosera

ड्रोसेरा / Drosera

ही एक युरोपीयन वनस्पती आहे याला सनडीव्स (Sundews) असे ही म्हणतात. यात जवळ जवळ १३० प्रजाती आहेत. या वनस्पती वर सफेद रंगाची फुले आढळून येतात आणि याची पाने जमिनी लगत खाली पसरलेली असतात. ह्या पानांवर छ्योट्या छ्योट्या केसांसारखे पेशी दिसून येतात व या पेशींवर चिकट असा द्रव पदार्थ तयार होतो. ह्या द्रव पदार्थाकडे छोटे छोटे किटक (insects) सहज आकर्षित होतात आणि त्या वर ते जाऊन बसतात. परंतु बसल्या नंतर त्या किटकास त्यातुन निघता येत नाही आणि तो जसा जसा निघण्याचा प्रयत्न करत जातो तसा तसा त्यात अजून अडकुन बसतो.

त्यानंतर त वनस्पतीचे पान हळु हळु बंद होत जाते व त्या किटकास पचवण्यास सुरु करते. जे पचत नाही ते खाली सोडून देते त्यानंतर परत नविन शिकारीसाठी आपल्या पहिल्या सामान्य स्थिती मध्ये येते. यांच्या काही मोठ्या जाती आहेत त्या बेडुक, पक्षी अशा छोट्या जीवांना सुद्धा खावून टाकतात.

डार्लिंगटोनिया कॅलिफोर्निका / Darlingtonia Californica

डार्लिंगटोनिया कॅलिफोर्निका / Darlingtonia Californica

हि वनस्पती कोब्रा लिली (kobra lilly) किंवा कोब्रा प्लांट (kobra plant) या नावाने सुद्धा ओळखले जाते. डार्लिंगटोनिया ही वनस्पती जास्त करून कॅलिफोरनिया मध्ये आढळली जाते. यांची काही जाती भारतात निलगिरी मध्ये सुद्धा आढळतात. याचे नाव कोब्रा लिली पडले कारण याच्या पानांचा आकार कोब्रा नागाच्या फणा सारखा दिसतो.

ही वनस्पती किटकांना आकर्षित करण्याकरीता गोड असा सुगंध सोडते. पानाचा वरील भाग हा फुगलेल्या फुग्या सारखा असतो आणि त्याच खालोखाल एक छोटी फट असते त्याच फटीतून किटक आत जातात आणि त्यात खाली पडतात.

डायोनिया मुस्कीपूला / Dionaea Muscipula

डायोनिया मुस्कीपूला / Dionaea Muscipula

ही एक मात्र अशी वनस्पती आहे की यांनी रचलेला सापळा हा उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. यास पाहण्यास कोणत्याही उपकरणाची अवश्यक्ता लागत नाही. हा एक किटक किंवा माशी (insects or flies) मारण्यासाठी एक प्रकारे जाळे निर्माण करून वाढतो. या झाडांची पाने एखाद्या राक्षसा (monster plant) सारखी खुप भयानक अशी दिसतात. जेव्हा कधी यावर किटक, माशी बसते तेव्हा लगेच हे पान बंद होते. या पानांचा आकार व त्याची बनावट अशी विचित्र आहे की यातून किटक बाहेर येवुच शकत नाही.

या वनस्पतीचे असे ही एक वैशिष्ट आहे की याला सजिव व निर्जीव याची सुद्धा जाणीव होते. ज निर्जीव वस्तु यात टाकल्यास ते पान आपोआप परत उघडते आणि ती वस्तू सोडून देते. कारण जिवंत जीव त्याच्या चपाट्यात आल्यानंतर जोवर तो जीव मारत नाही तोवर त्याची पाने उघडत नाही, आणि या प्रक्रियेस बहुतेक वेळेस कित्येक दिवस निघून जातात. हे पाहून या वनस्पती ला मेंदू (carnivorous plant with brain) आहे या गोष्टीची खात्री होते.

आपणास हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments