Friday, July 1, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रअहमदनगर५ वर्षांनंतरही कोपर्डीतील चिमुकलीला अजून न्याय मिळालेला नाही: मराठा समाजात निराशेचे वातावरण

५ वर्षांनंतरही कोपर्डीतील चिमुकलीला अजून न्याय मिळालेला नाही: मराठा समाजात निराशेचे वातावरण

आजचा दिवस दिनांक १३ जुलै हा मराठा समाजामध्ये काळा दिवस मानला जातो. आणि याचे कारण म्हणजे १३ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्रातल्या कोपर्डी गावात झालेली काळजाला चिरून टाकणारी घटना. १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर येथील कोपर्डी गावात ३ नराधमांनी १४ वर्षीय चिमुरडीचा बलात्कार करून निर्घुर्ण हत्या केली होती (kopardi rape and murder case).

समस्त मनुष्यजातीला काळिमा फासणाऱ्या या घटनेला आज ५ वर्ष उलटले तरीसुद्धा त्या नराधमांना अजून शिक्षा झालेली नाही हे दुखनीयच म्हणायला हवे. या दिवसाचा तीव्र निषेध प्रत्येक वेळेस मराठा कडून करण्यात येतो. आणि याचे कारण म्हणजे आरोपींना (rape accused) कोर्टाकडून शिक्षा सुनावली गेली असून सुद्धा त्याची अंमलबजावणी अजूनही सरकार कडून झालेली नाही.

कोपर्डी घटनेतील पीडित हि मराठा समाजाची असल्यामुळे समस्त मराठा समाज एकत्र आला होता आणि ५८ विशाल मोर्चे (maratha morcha) काढून आरोपींना लवकरात लवकर फाशी ची शिक्षा व्हावी याची मागणी करण्यात येत होती. “न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधतात हे आम्हाला आमची मुलगी गमावल्यावर लक्षात आले” अशी निराशाजनक भावना समस्त मराठा समाजात होती.

कोपर्डीतील चिमुकल्या श्रद्धावर झालेल्या अत्याचार मुळे, विदर्भ, मराठवाड़ा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणी कोकनात पोटजातीत विभागलेला आणि दुरावलेला पाच कोटी सकल कुनबी-मराठा समाज (maratha community) आपसातील सर्व वाद विसरून, एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच भगव्या खाली एक संघटित झाला होता. या घटनेला आज ५ वर्ष ओलांडले आहेत परंतु मराठा समाज आजही न्यायाचा प्रतीक्षेत आहे.

५८ मोर्च्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात अली होती. परंतु हत्या कांडातील नराधमांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही यामुळे मराठा समाजात अजूनही नाराजीचे आणि निराशेचे वातावरण आहे. सुनावलेलेल्या फाशीच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे, न्याय अजुन बाकी आहे, आणी तो लवकरात लवकर मिळावा हिच अपेक्षा आता मराठा समाज सरकार कडे करत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments