Saturday, July 2, 2022
No menu items!
Homeआरोग्यएकटेपणामुळे पुरुषांना होऊ शकतो कॅन्सर: वाचा सविस्तर वृत्त

एकटेपणामुळे पुरुषांना होऊ शकतो कॅन्सर: वाचा सविस्तर वृत्त

वॉशिंग्टन येथील इस्टर्न फिनलँड युनिव्हर्सिटी (University of Eastern Finland) मधील अभ्यासकांच्या नवीन अभ्यासानुसार माध्यम वयातील पुरुषांना एकटेपणामुळे (loneliness in men can cause cancer) कॅन्सर होण्याचा जास्त धोका असू शकतो. तेथील अभ्यासकांनुसार, एकटेपणा आणि सामाजिक नातेसंबंधांचा पुरुषांच्या आरोग्याशी आणि रोग प्रतिबंधकतेशी खूप जवळचा संबंध आहे. हि माहिती त्यांनी मानसोपचार संशोधनाच्या अंतर्गत प्रकाशित केली.

“गेल्या काही वर्षातील अभ्यासानुसार असा अंदाज घेण्यात येत आहे कि, पुरुषांमधील एकटेपणा (loneliness in men) हा सिगारेट स्मोकिंग किंवा लठ्ठपणाएवढाच घातक असू शकतो. आमच्या अभनसानुसार असे निदर्शनास येते कि या विषयाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.” असे इस्टर्न फिनलँड युनिव्हर्सिटीचे अभ्यासक सिरी लिसी क्रावं (Siiri-Liisi Kraav) यांनी सांगितले.

या अभ्यासाची सुरुवात १९८० मध्ये करण्यात अली होती आणि या अभ्यासात ईस्टर्न फिनलंड मधील २५७० मध्यमवयीन पुरुषांनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या आरोग्याचे आणि नैतिकतेचे निरीक्षण त्यावेळेस नोंद केलेल्या माहितीनुसार करण्यात येत होते आणि ते आज च्या चालू दिवसापर्यंत करण्यात येत आहे.

एकटेपणामुळे पुरुषांमधील कॅन्सरचा धोका हा १०% नि वाढतो असे लक्षात आले आहे (loneliness in men increases risk of cancer by 10%)

या अभ्यासाचा पाठपुरावा करताना असे लक्षात आले कि ६४९ पुरुषांना म्हणजेच २५% पुरुषांना कॅन्सर झाला आणि त्यातील २८३ पुरुष म्हणजेच ११% पुरुष कॅन्सर मुळे दगावले. एकटेपणामुळे वाढलेला कॅन्सरचा धोका अभ्यासात सामील असलेल्या पुरुषांचे वय, सामाजिक व आर्थिक स्थिती, त्यांची जीवनशैली, झोपेची गुणवत्ता, उदासीनतेचे लक्षणे, बॉडी मास इंडेक्स, हृदयाचे आजार, आणि इतर धोकादायक गोष्टींना लक्षात न घेता बांधण्यात आला होता. विशेषतः लग्न न झालेले, विधवा, आणि घटस्फोटित पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका जास्त बघण्यात आला होता.

“एकटेपणामुळे आरोग्याला होणाऱ्या धोक्याची जागरूकता आता लोकांमध्ये जास्त पसरत आहे. त्यामुळे या विषयावर अजून खोलवर जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे कि एकटेपणामुळे हे आजार कसे होत आहेत. हि माहिती आपल्याला एकटेपणा आणि त्याचे दुष्परिणाम (loneliness and its health effects) कसे दूर करता येतील यासाठी मार्ग शोधण्यास मदत करेल आणि त्याचसोबत प्रतिबंधात्मक गोष्टींवर काम करण्यास सुद्धा मदत होईल.” ANI

With inputs from ANI

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments