Saturday, July 2, 2022
No menu items!
Homeबातम्याकोरोनामहाराष्ट्रातील लॉकडाऊन सध्यातरी शिथिल होणार नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सध्यातरी शिथिल होणार नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या ३ ऱ्या लाटेचा (corona 3rd wave) धोका पाहता महाराष्ट्रातील लॉकडाऊन सध्यातरी शिथिल होणार नाही अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच त्यांनी हि बातमी पत्रकारांना दिली. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत चर्चा होणार होती परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारकडून लॉकडाऊन (Maharashtra lockdown continues) असाच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा लॉकडाऊन हा असाच कायम राहील आणि यात कुठलाही बदल केलेला नाही (no changes in Maharashtra lockdown). फक्त महाराष्ट्राबाहेरून येणारे प्रवासी ज्यांनी लसीचे २ डोस पूर्ण केले आहेत त्यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी असेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका (Maharashtra lockdown, Covid 3rd wave threat)

इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association / IMA) ने भारतात तिसऱ्या लाटेची चेतावणी दिलेली आहे (3rd wave in India) त्यामुळे महाराष्ट्रात सावधगिरीने पुढील वाटचाल केली जाईल असे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. टोपे यांनी हे अगदी स्पष्टपणे सांगितले कि लॉकडाऊन (Maharashtra lockdown) शिथिल करण्यासाठी कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नाहीये आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सध्याच्या कोरोना लॉकडाऊन (Lockdown rules in Maharashtra) नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा राज्य सरकार करत आहे असे सुद्धा टोपे म्हणाले.

लसीकरण (Maharashtra vaccination)

“सध्याची लसीकरणाची गती हि चांगली सुरु आहे, आणि आम्ही ती अजून वाढण्यावर लक्ष देत आहोत. महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्यात करोडो लसी मिळणार आहेत. आणि महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी १००० नवीन डॉक्टर्स (1000 new doctors to be appointed) ची भरती सुद्धा करणार. भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात करण्यात येईल.” असे राजेश टोपे यांनी सांगितले.

प्रवासासाठी RT-PCR रिपोर्ट ची गरज नाही

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे सुद्धा सांगितले कि विमानाने महाराष्ट्रात (Maharashtra by air travel rules) येणाऱ्या प्रवास्यांनी जर लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना नेगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट ची गरज नाही. अश्या प्रवाश्यांना फक्त त्यांच्या दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments