Monday, June 27, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेहेल्मेटसक्ती, ट्राफिक पोलीस, भरमसाठ फाईन, आणि पुणेकरांचे विचार: वाचा सविस्तर

हेल्मेटसक्ती, ट्राफिक पोलीस, भरमसाठ फाईन, आणि पुणेकरांचे विचार: वाचा सविस्तर

पुणेकरांकडून बाईक प्रवासाला नेहमीच पसंती दर्शवली गेली आहे. सुरुवातीपासूनच पुणेकर सिटी बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ट्रेन पेक्षा स्वतः च्या बाईक ने प्रवास करण्याला जास्त प्राधान्य देतात. परंतु बाईक वापरण्या निगडित नियमांबद्दल पुणेकरांचे जरा काही वेगळेच विचार आहेत. पुणेकरांचा हेम्लेट सक्तीला (helmet rule in Pune) नेहमी विरोध असतो हे सर्वांना माहीत आहे. तरीही कार्यवाही काही थांबताना दिसत नाही.

पोलिसांकडून (Pune police) मात्र पुर्ण नेटाने कार्यवाही केली जाते. अशातच १० ऑक्टोबर २०१६ रोजी पुणे पोलिस आयुक्तालयातील तब्बल ४३ पोलिसांवर विना हेल्मेटची (helmet fine) कार्यवाही करण्यात आली होती. तसेच २०१६ रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र विधानसभेतुन एक सर्क्युलर काढला होता. तो म्हणजे “नो हे हेल्मेट नो फ्युएल” (no helmet no fuel) म्हणजेच प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करूनच पेट्रोल भरण्यास पेट्रोल पंपावर जावे अन्यथा पेट्रोल देण्यात येणार नाही.

अशातच अनेक वेळा नियम बनन्या आधीच नियम न पाळण्यासाठी पळवाटा तयार असतात.

अगदी तसेच काही चित्र त्यावेळेसही शहरांमध्ये पाहण्यास मिळाले होते. जे नागरिक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास विना हेल्मेट जात होते ते इतर दुचाकीस्वाराकडून हेल्मेट घेवून पेट्रोल भरत होते. परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांच्या “नो हे हेल्मेट नो फ्युएल” या संकल्पनेला पेट्रोल पंप मालकांनी व्यवसाय कमी होत आहे असे कारण देऊन केराची टोपली दाखवली. आणि दुचाकीस्वार नागरिकांनी “तुम्ही आधी रस्ते सुधारा, मग आम्ही नियम पाळू” असे म्हणत नाकारले, आणि या नियमाला घरचा आहेर दिला.

या काळात वाहतुक (Pune traffic police) विभागाने दिलेल्या आकडेवाडीनुसार जानेवारी ते मे २०२१ दरम्यान १६ लाख विना हेल्मेट (helmet compulsory rule) दुचाकीस्वारांकडून नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारवाई अंतर्गत तब्बल ८० कोटी इतकी रक्कम वसुल करण्यात आली होती. २०२१ मधील पहिल्या पाच महिन्यात दुचाकीस्वारांकरिता ही सर्वांत मोठी कार्यवाही होती.

काही दुचाकीस्वारांच्या प्रतिक्रिया आम्ही नोंदविल्या आहेत, त्या बघुयात:

हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवणे हे जितके नियमांचे पालन करण्याकरिता आणी दंडा पासुन लांब राहण्यांस जितके महत्वाचे आहे तितकेच होणाऱ्या अपघातामध्ये जिव वाचणेही महत्वाचे आहे. परंतु पोलिसांच्या अशा दंड वसुलीने काहीही फरक पडणार नाही दंड घेण्या पेक्षा विना हेल्मेट, विना विमा, विना पि.यु.सि असनाऱ्यांना तातडीने हेल्मेट विमा पि.यु.सि जागेवरच देवून टाकावी अश्याने गुन्हे किंवा इतर गोष्टी होणार नाहीत.
निखिल शिवले
(एक दुचाकीस्वार)

ज्या कारणांमुळे आपले ट्राफिक पोलीस दंड करतात ते कारणच नष्ट करता येतील का? विचार करण्यासारखे आहे.
दीपंकर पाटील
(समाजसेवक)

हेल्मेटला आमचा विरोध नाही परंतु सक्ती नसावी. शासनाला सक्ती करायचीच असेल तर जे नैशनल हायवे आहेत त्यावर करावी कारण खरी गरज तिथे आहे. पुणे हे गल्लीबोळाचे ठिकाण आहे येथे गाडीचा वेग हा ३० ते ३५ च्या दरम्यान राहतो त्यात दर २०० ते ३०० मीटर वर सिग्नल आहेत. दर गल्लीमध्ये १०० मीटर वर गतीरोधक आहेत. गाडीला वेगच मिळणे अशक्य नाही, त्यात रस्ते अरुंद आणी त्या रस्त्यानमधे खड्डे अशा अवस्तेत दुचाकीस्वार पडला तरी त्याला काही ईजा होणार नाही.
प्रवीण काटकर
(समाजसेवक)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments