Sunday, June 26, 2022
No menu items!
Homeबातम्याआर्थिक / वित्तसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने दिली ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने दिली ७ व्या वेतन आयोगाला मंजुरी

सरकारी कर्मचाऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. या कोरोना महामारीच्या काळात सरकारी कर्मचारी ज्या महागाई भत्ता Dearness Allowance (DA) वाढीची वाट बघत होते तो अखेर केंद्र सरकार ने १७% वरून २८% करण्यास मंजुरी दिली आहे. झी बिसनेसने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता वाढीचा प्रस्थावावर मागील वर्षी कोरोना महामारीमुळे स्थगिती देण्यात अली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळात हा निर्णय आज घेण्यात आला.

मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाला १ आठवडाही पूर्ण झाला नाही परंतु या नवीन मंत्रिमंडळाची हि दुसरी बैठक होती. कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची संयुक्त परिषद यंत्रणेमार्फत (The Joint Council Machinery for Central Government Employees -JCM) महागाई भत्ता (Dearness Allowance / DA) आणि महागाई सवलत (Dearness Relief / DR) वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी जे या निर्णयाची आतुरतेने वाट बघत होते त्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्राने महागाई भत्ता (7va vetan aayog) वाढवला तर आहेच परंतु केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वाढवलेल्या महागाई भत्त्याचा फायदा सप्टेंबर महिन्यापासून मिळेल कि नाही या गोष्टीची अजून पुष्टता झालेली नाही. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना वाढलेल्या महागाई भत्याचा फायदा मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो कारण या प्रकरणात बऱ्याच मंजुऱ्या घ्याव्या लागतात.  अश्या प्रकारच्या विलंभची थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलै पासून मिळेल.

हा ११% वाढवलेला महागाई भत्ता (7th vetan ayog)हा मागील ३ प्रलंबित हफ्त्यांना लक्षात घेऊन देण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीचा १ महागाई भत्ता आणि या वर्षीचे २ प्रलंबित भत्ते लक्षात घेऊन हि वाढ मंजूर करण्यात आली आहे.

आज दिवसाच्या सुरुवातीला अशी माहिती आली होती कि आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (Dearness Allowance / DA) आणि महागाई सवलत (Dearness Relief / DR) वाढविण्यास मंजुरी दिली जाऊ शकते जी जुलै पासून प्रभावात येईल.

जुलै महिन्यातील ३% ची वाढ आणि मागील महिन्यातील इतर वाढी लक्षात घेता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकूण २८% महागाई भत्ता दिला जाईल. आणि या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि या महामारीच्या काळात मोठी मदत सुद्धा होणार आहे.

महागाई भत्ता (Dearness Allowance / DA) म्हणजे केंद्र सरकार द्वारे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक रक्कम आहे जी महामारीचा सामना करण्यासाठी सरकार कडून दिली जाते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments