Tuesday, June 28, 2022
No menu items!
Homeबातम्याआर्थिक / वित्तप्रधान मंत्री किसान मानधन योजना: मिळवा वर्षाला ३६,००० रुपयाचा निधी - वाचा...

प्रधान मंत्री किसान मानधन योजना: मिळवा वर्षाला ३६,००० रुपयाचा निधी – वाचा सविस्तर वृत्त

प्रधान मंत्री किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे त्यांना अधिक ३००० रुपये प्रति महिना किंवा ३६,००० प्रति वर्ष आर्थिक मदत सुद्धा आता मिळवता येऊ शकते. हि रक्कम तुम्हाला केंद्र सरकारच्या “प्रधान मंत्री किसान मान धन योजना” या योजने अंतर्गत मासिक निवृत्तीवेतन म्हणून मिळेल.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या विधानानुसार, प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) जी केंद्राच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत भारतातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६००० रुपयाची आर्थिक मदत करत आहे.

आता प्रधान मंत्री किसान मान धन योजना Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana (PMKMY) लहान व सूक्ष्म शेतकरी कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने निवृत्तीवेतनाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणार आहे असे केंद्र सरकार ने सांगितले आहे.

प्रधान मंत्री किसान मानधन योजनेची माहिती पुढील प्रमाणे – Pradhan Mantri Kisan MaanDhan Yojana (PMKMY)

या योजनेअंतर्गत योजनेस पात्र लहान व सूक्ष्म शेतकऱ्यांना रुपये ३००० किमान निश्चित पेन्शनच्या Minimum Fixed Pension स्वरूपात देण्यात येणार आहे.

या योजनेस पात्र असलेल्या लहान व सूक्ष्म शेतकऱ्यांना वय वर्षे ६० पासून हि रक्कम पेन्शन च्या स्वरूपात मिळण्यास सुरुवात होईल.

हि योजना (Pension Scheme) ऐच्छिक असणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना छोटे योगदान सुद्धा द्यावे लागणार आहे.

या योजनेसाठी Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana (PMKMY) Scheme पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रवेशाच्या वेळीच्या वयानुसार ५५ रुपये ते २०० रुपये प्रतिमाह योगदान करावे लागणार आहे.

केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या योगदानाएवढ्या रकमेचे योगदान स्वतः त्या पेन्शन खात्यात (Pension Fund) करणार आहे.

१८ ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या राज्य किंवा केंद्र सरकार नामांकित सामान्य सेवा केंद्र Common Service Center (CSC) किंवा नोडल अधिकाऱ्यांशी (PM-Kisan) संपर्क करावा.

शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन सुद्धा नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी www.pmkmy.gov.in येथे भेट द्या.

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा आणि इतर बांधवांनी हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत करा हि विनंती. पोस्ट शेयर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचावा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments