Saturday, June 25, 2022
No menu items!
Homeबातम्याक्राईम / गुन्हेगारीधारधार हत्याराने केला आईचा खून: तळेगाव दाभाडे येथील भयानक घटना

धारधार हत्याराने केला आईचा खून: तळेगाव दाभाडे येथील भयानक घटना

Son murders stepmother in Talegaon Dabhade

वडील सावत्र आईला वेळ आणी जास्तीचे महत्व देत असल्यामुळे रंगाच्या भरात मुलाने आपल्या सावत्र आईचा खुन (Son murders mother) केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे झाली आहे. घटना १४ जुलै २०२१ रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनी मध्ये घडली आहे. खुन झालेल्या महिलेचे नाव रेखा, वय ४० असुन या खुनाची तक्रार आरोपीचा सावत्र भाऊ ऋषिकेश सुभाष वाघमारे वय (१५, राहणार श्रीहरी कॉलनी तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे.

खून झालेल्या महिलेने पतीची कॅन्सर मुळे मृत्यू झाल्याच्या २ वर्षानंतर आपल्या शेजार्यांशी लग्न केले होते. परंतु शेजारील व्यक्ती हा आधीपासून विवाहित होता आणि त्याला एक १७ वर्षाचा मुलगा सुद्धा होता. खून झालेल्या महिलेला सुद्धा एक १५ वर्षाचा मुलगा होता ज्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली.

Woman marries neighbor and gets murdered by her stepson.

त्यानुसार फिर्यादीचा सावत्र अल्पवयीन भावा विरोधात तळेगाव पोलिस स्टेशनईथे गुन्हांची आरोपी विरुद्ध गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार तो रात्री आपल्या सावत्र आईकडे (Stepmother) मटन बनवले असल्याने जेवणास गेला होता. तिथे गेल्यानंतर आरोपी हा आपल्या वडील आणी सावत्र आईसोबत वाद विवाद करत होता. हा समोर चाललेला वाद पाहुन फिर्यादी तेथुन घराबाहेर पडला.

आरोपीने वाद चालु असताना घरातील धारधार कोयत्याने सावत्र आईच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर वार केले. यात सावत्र आई रेखा ही जागीच मुत्यु पावली. त्यानंतर आरोपी हा घरातुन निघुन गेला.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबापेक्षा दुसऱ्या पत्नीबरोबर या व्यक्तीने जास्त वेळ कसा घालवला यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले होते. “त्याच्या पत्नीच्याही (आरोपीची आई) हाताला जखमा आहेत पण आम्हाला अशी शंका आहे की ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत होती आणि या प्रक्रियेमध्ये जखमी झाली असावी. ते बाहेर आल्यावर कोणालाही खुनाचा संशय आला नाही.” अशी माहिती वरिष्ठ पीआय जाधव यांनी दिली.

आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments