Friday, March 29, 2024
No menu items!
Homeबातम्यापोटाच्या ऑपरेशन साठी जमा केलेल्या पैश्यांचा उंदरांनी केला सत्यानाश: भाजीपाला शेतकऱ्याची दुःखद...

पोटाच्या ऑपरेशन साठी जमा केलेल्या पैश्यांचा उंदरांनी केला सत्यानाश: भाजीपाला शेतकऱ्याची दुःखद कहानी

तेलंगाना मधील मेहबूबनगर येथील एका भाजीपाला शेतकऱ्यांसोबत वेगळाच अनर्थ घडला आहे. रेडया नाईक (Redya Naik) नावाच्या या शेतकऱ्याने स्वतःच्या पोटाच्या ऑपरेशन साठी पाई पाई जोडून २ लाख रुपये एवढी रक्कम रोख साठवून ठेवली होती. जेव्हा त्यांनी हि जमापुंजी बाहेर काढली त्यांना धक्काच बसला कारण उंदरांनी सर्व नोटांचा कुरतडून सत्यानाश करून ठेवला होता.

पोटाच्या ऑपरेशन साठी जमा केलेल्या पैश्यांचा उंदरांनी केला सत्यानाश | Rats bite off all savings of a vegetable farmer in Telangana

रेडया नाईक यांनी भाजीपाला विकून आणि इतरांकडून उधार घेऊन त्यांच्या पोटाच्या ऑपरेशन साठी हि रक्कम त्यांच्या कपाटात ठेवली होती. परंतु त्यांना या गोष्टीची जरा सुद्धा भनक नव्हती कि फक्त काही छोटे उंदीर त्यांच्या कष्टाच्या पैश्याचा नायनाट करणार आहेत.

द न्यूस मिनिट यांनी दिलेल्या माहिती नुसार रेडया नाईक यांनी ५०० च्या नोटांच्या स्वरूपात हि रक्कम त्यांच्या आलमारी / कपाटात ठेवली होती. (500 rupee notes chewed by rats in Telangana) परंतु आलमारी ला असलेल्या छोट्या खड्यामधून उंदरांनी अलमारीमध्ये प्रवेश केला आणि भरपूर नोटांचा चावून चुरा केला.

टाइम्स ऑफ इंडिया च्या वृत्तानुसार नाईक म्हणाले कि “भाजीपाला विकून जमवलेली हि माझी सर्व बचत केलेली रक्कम होती. मी हि रोख रक्कम एका सुटी कापडात बांधून ठेवली होती. पण जेव्हा मी ते उघडून बघितले तेव्हा मला धक्काच बसला. सगळ्या ५०० च्या नोटा उंदरांनी कुरतडून खराब करून ठेवल्या होत्या.”

बँक कर्मचाऱ्यांनी कुरतडलेल्या नोटा बदली करून देण्यास दिला नकार | Bank officials decline the request to change the damaged currency notes

या धक्क्यामुळे दुःखात असलेल्या या शेतकऱ्याने बँकमध्ये नोटा बदली करून मिळतील अश्या अपेक्षेत लगेचच बँक सुद्धा गाठली. परंतु बँक कर्मचाऱ्यांनी त्यांची विनंती नाकारली. (bank declines to exchange notes chewed by rats) बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आणलेल्या या नोटा आता वैध नाहीत. तरी तुम्ही रिसर्व बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन संपर्क करा बहुतेक तुम्हाला तेथून मदत मिळू शकते.

“मी एक नाही तर मेहबूबाबाद येथील बऱ्याच बँक मध्ये जाऊन खराब झालेल्या नोटा बदलून देण्याची विनंती केली. परंतु सर्व बँक कर्मचाऱ्यांनी उंदरांनी कुरतडलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला.” असे रेडया नाईक यांनी सांगितले.

आदिवासी, महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी पुढे केला मदतीचा हात । Telangana, Minister of Tribal, Women’s and Child Welfare comes for aid

सोशल मेडिया वर या पीडित शेतकऱ्याची दुःखद कहाणी वायरल झाल्यावर तेलंगाना मधील आदिवासी, महिला आणि बालकल्याण मंत्री सत्यवथी राठोड (Satyavathi Rathod) यांनी अखेर पुढाकार घेतला. त्यांनी नाईक यांना हमी दिली कि त्यांचे ऑपरेशन त्यांच्या पसंतीच्या हॉस्पिटल मध्ये करून देण्यास त्या त्यांना मदत करतील आणि आर्थिक साहाय्य सुद्धा करतील. नाईक यांनी मंत्री सत्यवथी राठोड यांचे आभार मानले. (Telangana minister helps farmer after story goes viral that his savings was chewed off by rats)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments