Saturday, July 2, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेआर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन मार्फत अनाथाश्रमात बूट कपडे व किराणा वाटप: पुणे

आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन मार्फत अनाथाश्रमात बूट कपडे व किराणा वाटप: पुणे

या कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सगळ्यांचीच आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कठीण झाली आहे. त्यात आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन सारख्या अनोख्या संस्था गरजूंना मदत करून मोठा दिलासा देत आहेत. गोर गरिबांना जेवण वाटप, किराणा वाटप, पोलीस प्रशासनाला वेळोवेळी मदत, कोरोना काळात वैद्यकीय मदत अश्या बऱ्याच उपक्रमात आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन चे नाव बऱ्याच वेळा ऐकण्यात येते.

अनोख्या पद्धतीने सामाजिक कार्य करणाऱ्या आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशनने यावेळी सुद्धा एक अनोखा उपक्रम घेतला आहे. आणि तो म्हणजे उन्नती बालग्राम येतील अनाथ व गरजू मुलांना स्पोर्ट शूस, सॉक्स, चप्पल, ट्रॅकपँट, टीशर्ट आणि किराणा वाटप.

उन्नती बालग्राम पुणे व आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन पुणे | Unnati Balgram Pune & NGO Art of Helping Foundation Pune

पुण्यातील उन्नती बालग्राम या छोट्याश्या अनाथ व गरजू मुलांच्या वसतिगृहामध्ये आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन तर्फे नेहमीच मदत केली जाते. परंतु यावेळेस उन्नती बालग्रामचे संस्थापक हितेश वाधवानी यांनी आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपंकर पाटील यांना एक वेगळीच विनंती केली. ती म्हणजे या मुलांसाठी बूट व नाईट ड्रेस.

उन्नती बालग्राम येथे बालकामगारीतून (Child Labor) सोड्वलेली मुले आहेत. आणि या मुलांची शालेय व सामाजिक जबाबदारी उन्नती बालग्राम ने पूर्णपणे घेतली आहे. या मुलांची राहण्याची खान्याची व शाळेची सोया सुद्धा तेथेच करण्यात आली आहे.

आर्ट ऑफ हेलपिंग (Art of Helping NGO) मार्फत याआधी सुद्धा उन्नती बालग्राम मध्ये, कॉम्पुटर, सॅनिटायसर, मुलांसाठी खाऊ वाटप असे विविध कार्यक्रम करण्यात आले होते. परंतु या मुलांच्या क्रीडा शिक्षणासाठी त्यांच्याकडे बूट नाहीत आणि त्यांना रात्री झोपायला कपडेच नाही अशी खंत हितेश यांनी दीपंकर यांच्याजवळ व्यक्त केली.

आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन मार्फत अनाथाश्रमात बूट कपडे व किराणा वाटप | Art of Helping Foundation (NGO) Shoes, Cloths distribution in Unnati Balgram

काही दिवसातच आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशनच्या टीमने (NGO in Pune) सर्व मुलांसाठी स्पोर्ट शूस, सॉक्स, चप्पल, ट्रॅकपँट, टीशर्ट या वस्तूंची सोय करून रविवारी उन्नती बालग्रामला जाऊन त्याचे वाटप केले. यासोबतच त्यांनी मुलांसाठी चॉकलेट व थोडा किराणा सामान सुद्धा दिला. मुलांसोबत आर्ट ऑफ हेलपिंग च्या संपूर्ण टीम ने खूप सारे खेळ सुद्धा खेळले.

या कार्यक्रमात आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन मधून संस्थापक अध्यक्ष दीपंकर पाटील, चेतन शेवाळे, प्रवीण काटकर, निखिल शिवले, आणि वैष्णवी मुंदडा उपस्थित होते. या कार्यक्रमात मिलन खानावळ हॉटेलचे मालक, उद्योजक दीपक सुभेदार हे सुद्धा उपस्थितीत होते. Social Workers in Pune

या कठीण काळात गरजूंना सर्व प्रकारे मदत करून आधार देणाऱ्या आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन टीमला युनायटेड महाराष्ट्र टीमचा सलाम. Art of Helping Foundation Pune

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments