Thursday, August 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणे१० लाख रुपयापर्यंतची कामे आता विना टेंडर कॉन्ट्रॅक्टरला देता येणार: राज्य सरकारचा...

१० लाख रुपयापर्यंतची कामे आता विना टेंडर कॉन्ट्रॅक्टरला देता येणार: राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

दहा लाख रुपये पर्यंतची सिविल कामे आता विना टेंडर (without tender) काढता कॉन्ट्रॅक्टरला देता येणार. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणी कामगार विभागाने १ डिसेंबर २०१६ रोजी च्या नागरी कामे वाटपासाठी सुधारित तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार या अगोदर विना निविदा प्रक्रिये नुसार ३ लाख रुपयांची कामे विना टेंडर (without tender corporation work) काढता कॉन्ट्रॅक्टरला देता येत होती.

राज्य सरकारने (Maharashtra state government) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात त्याने सर्व महानगरपालिकेला नागरी कामे करण्या करिता विना निविदा (टेंडर) काढता देण्यात येणारी कामांची रक्कम ३ लाखाऊन १० लाख इतकी करण्यात आली आहे. यापुढे या निर्णयया मुळे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व १० लाख रुपयापर्यंतची कामे विना टेंडर काढता करता येणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली माहिती.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सोमवार दिनांक १९/०७/२०२१ रोजी राज्य सरकारच्या निर्णयया वरून माहिती दिली. ढाकणे यांनी सांगितले कि यापूर्वी सर्व ठेकेदारांना निविदा मागितल्या शिवाय फक्त ३ लाख रुपयांची कामे देण्यात येत होती तीच रक्कम आता वाढून १० लाख करण्यात अली आहे. तसेच हा निर्णय मागील महिन्यात राज्य सरकारने घेतला होता परंतु या संबधी सूचना आता प्राप्त झाल्या कारणाने या पुढे याची अंमलबजावणी होणार आहे. आणि हि मार्गदर्शक तत्वे सर्व नगरपालिकांना लागू होणार आहेत.

Now contractors can get work of upto 10 lacs from corporation without any tender process

नागरी कामांमध्ये तुटलेली पदपथांची दुरुस्ती, ड्रेनेज लाईन किंवा खड्डे अश्या प्रकारची सर्व छोटीकामे यातून केली जातात. अश्या प्रकारची कामे हि नागरिकांसाठी खूप जलद गतीने कारवी लागतात. याच कारणामुळे अशा छोट्या कामांसाठी जर निविदा मागवण्यात आल्या तर अश्या कामांना संपूर्ण निविदा प्रक्रिया संपे पर्यंत अधिकचा वेळ जाऊ शकतो. या कारणाने हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

नागरी अधिकाऱ्यांच्या म्हण्या नुसार अशी निविदा मागितल्याशिवाय नागरी कामे देण्याची यंत्रणा केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशातच प्रचलित आहे. कारण अशी कामे आणीबाणीच्या वेळेस करणे गरजेचे असते. उदाहरन पदपथ फुटला असेल तर त्यात अडथळुन नागरिक जखमी होऊ शकतात, आणि त्याच कारणाने अशी सर्व कामे अतितातडीने कारवी लागतात.

राज्य सरकारने कळविले आहे कि १० लाख वरील कामे हि ई निविदा प्रणालीनेच केली जाणार आहे.

सध्या पिंपरी चिंचवडचे प्रशासकीय कार्यालय पिंपरी चौकात आहे. हि इमारत ४ मजली आहे, आणि या इमारतीचे उदघाटन १९८७ साली करण्यात आले होते. या नागरी मंडळाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे ठरविले आहे. नवीन प्रशासकीय इमारत चिंचवड ऑटो क्लस्टरजवळ येण्याची शक्यता आहे. ही इमारत १३ मजली असेल आणि ५५० कोटी रुपये इतका निधी खर्चून बांधले जाण्याची शक्यता आहे.

या नागरी मंडळाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सल्लागार म्हणून पिंपरी चिंचवड नगरपालिकेने एक आर्किटेक्चरल फर्म, सुनील पाटील अँन्ड असोसिएट्सची नेमणूक केली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments