तृप्ती घोगरे-पाटील Trupti Ghogare Patil यांची केंद्र सरकारच्या संशोधन संस्थे मध्ये ‘सिनियर प्रोजेक्ट असोसिएट’ Senior Project Associate पदावर नियुक्ती झाली आहे. वैज्ञानिक लोकांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची असलेली, ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे’ Indian Institute of Science Education and Research, Pune (IISER) ही केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेली स्वायत्त संस्था आहे. ज्याप्रमाणे ‘आय आय टी’ IIT, ‘आय आय एम’ IIM असतात अगदी त्याच धर्तीवर पण विज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधन व्हावे या उद्देशाने या अद्ययावत संस्थेचा जन्म झाला.
हे सुद्धा वाचा: आर्ट ऑफ हेलपिंग फाउंडेशन मार्फत अनाथाश्रमात बूट कपडे व किराणा वाटप: पुणे
तृप्ती यांची फिजिक्स (Physics भौतिकशास्त्र) मध्ये डॉक्टरेट झाल्यामुळे आणि त्यांच्या शैक्षणिक दर्जामुळे या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. केवळ एक पोस्ट होती आणि देशभरातून अर्ज आलेले असताना सुद्धा त्यांची निवड झाली ही विशेष कौतुकाची बाब.
पदार्थविज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे आणि जगद्विख्यात शास्त्रज्ञ प्रा. सतीशचंद्र ओगले, सरांच्या प्रयोगशाळेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करायला भेटत आहे. येणारा काळ हा ‘ विद्युत बॅटरी’ चा आहे. त्यासंदर्भात मूलभूत संशोधन करण्याची संधी मिळाली ही सुद्धा महत्वाची बाब. त्यांच्या या निवडीबाबत सर्व स्थरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे सुद्धा वाचा: पोटाच्या ऑपरेशन साठी जमा केलेल्या पैश्यांचा उंदरांनी केला सत्यानाश: भाजीपाला शेतकऱ्याची दुःखद कहानी
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.