Wednesday, June 29, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरमृतांचा आकडा आता १३८, जवळपास १ लाख ३५ हजार नागरिक स्थलांतरित: महाराष्ट्र...

मृतांचा आकडा आता १३८, जवळपास १ लाख ३५ हजार नागरिक स्थलांतरित: महाराष्ट्र अतिवृष्टी

महाराष्ट्रातील अतिवृष्टी (maharashtra rain & flood) आणि पूर्वपरिस्थितीतील मृतांचा आकडा आता १३८ वर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील बरीच शहरे आणि लगतची गावे पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत आणि तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

राज्य सरकारच्या आकड्यांनुसार पूरग्रस्त भागातील (flooded area) १ लाख ३५ हजार नागरिकांचे स्थलांतर (flood relocation) करण्यात आले आहे.

“२४ जुलै संध्याकाळी ९ वाजून ३० मिनिटांपर्यंतच्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातील जवळजवळ १ लाख ३५ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंतचा मृतांचा आकडा ११२ आहे आणि एकूण ३२२१ जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. एकूण ५३ नागरिक जखमी आहेत आणि ९९ नागरिक बेपत्ता आहेत.” अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. (99 still missing, Maharashtra flood updates)

दरम्यान पुराचे पाणी रस्ते, वस्ती आणि शेतजमिनींनवर शिरले आहे. सांगली जिल्यातील बरेच भाग पूर्णपणे पाण्यात बुडले आहेत. जवळपासचे नागरिक दक्षतेने सर्व परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. Maharashtra flood: roads and areas submerged in water.

सांगली जिल्यातील सांगलीवाडी विभाग अजूनही पूर्णपणे पाण्यात बुडलेला आहे. Sangliwadi in Sangli district still submerged under water.

“पुराचे पाणी कमी होत आहे असा दावा सरकार कडून करण्यात येत आहे. परंतु सत्यपरिस्थितीमध्ये वारणा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे येथे पाणी वाढत आहे.” असे नागरिकांनी न्युस एजन्सी ANI ला सांगितले.

महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातील सुमारे ७५००० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्यात अतिवृष्टीमुळे जवळपास ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 7 died due to heavy rain and flood situation in Kolhapur Maharashtra.

स्थलांतरीत केलेल्या नागरिकांपैकी ६७,१११ नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. व जवळपास ८००० नागरिकांना सरकारतर्फे निवारा देण्यात आला आहे.

NDRF च्या अजून ८ टीम तैनात

या आपत्कालीन परिस्थितीसाठी NDRF च्या अजून ८ टीम बचाव व मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे NDRF च्या एकूण ३४ टीम बचाव व मदतकार्यासाठी कार्यशील आहेत.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments