Friday, July 1, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरIMD ने दिला काही राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा १४९ वर...

IMD ने दिला काही राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा १४९ वर पोहोचला

दक्षिण भारतात पावसाचा विध्वंस सुरूच. Heavy rains continue in South India. जीवित आणि आर्थिक हानी पाहता महाराष्ट्राला सर्वाधिक नुकसान झाले आहे. Maharashtra is hit the most. महाराष्ट्रात पूर, भूस्खलन आणि इतर अतिवृष्टीच्या घटनांमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा आता १४९ वर जाऊन पोहोचला आहे. Death count reaches 149 in Maharashtra Floods. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील शोध आणि बचावकार्यात मृतदेह सापडल्याने हा आकडा १४९ पोहोचला आहे.

राज्य सरकार च्या म्हणण्यानुसार अजून किमान ६४ नागरिक बेपत्ता आहेत अन यशोध प्रक्रिया सुरु आहे. 64 citzens missing in Maharashtra floods. आत्तापर्यंत किमान ५० नागरिक अतिवृष्टीच्या घटनांमुळे जखमी झाले आहेत. आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घटना स्थळांवरून एकूण २,२९,०७४ नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. 2,29,074 relocated in to safe locations from flooded areas in Maharashtra.

राज्याच्या सचिवालय नियंत्रण कक्षाने रविवारी २५ जुलै २०२१ ला संध्याकाळी माहिती प्रसारित केली. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार सातारा जिल्ह्यातून २८, आणि रायगड जिल्ह्यातून ८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

सरकारी आकड्यानुसार १४९ मृत्यूंची नोंद पुढील जिल्ह्यांमधून झाली आहे.

रायगड – ६० | Raigad Death Count: 60
सातारा – ४१ | Satara Death Count: 41
रत्नागिरी – २१ | Ratnagiri Death Count: 21
ठाणे – १२ | Thane Death Count: 12
कोल्हापूर – | Kolhapur Death Count: 7
उपनगरी मुंबई – | Subarban Mumbai Death Count: 4
सिंधुदुर्ग – | Sindhudurgh Death Count: 2
पुणे – | Pune Death Count: 2

कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि पुण्यातील एकूण ८७५ गावांमध्ये अतिवृष्टीच्या घटनांची नोंद झाली आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली. 874 villages are affected in Maharashtra floods and rain disaster.

“रत्नागिरीमधील चिपळूण मध्ये एकूण पाच (५) मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. NDRF च्या २५ टीम्स, SDRF च्या ४ टीम्स, तटरक्षकांच्या ४ टीम्स, नौदलाच्या ५ आणि सेनेच्या ३ तुकड्या मदत आणि बचाव कार्य करत आहेत.” असे विधानात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिपळूणला दिली भेट | CM Uddhav Thakrey visits affected places.

रविवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिपळूणला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नागरिक, व्यापारी, आणि दुकानदारांशी सुद्धा संवाद साधला. राज्यसरकारकडून झालेल्या नुकसानीसाठी मदत करण्यात येईल असा वायदा दिला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला केंद्राची सुद्धा मदत लागणार आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले कि ते झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

देशातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाने काही राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा. IMD warns states for heavy rains.

हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे असा इशारा IMD ने दिला आहे. यासोबतच , मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, उप-हिमालयीय पश्चिम बंगाल, सिक्किम, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, गुजरात, किनारी कर्नाटक, केरळ आणि माहे येथील काही भागांमध्ये सुद्धा अति मुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments