Thursday, August 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपुणेआर्ट ऑफ हेलपिंग फाऊंडेशन व सामाजिक फेसबुक ग्रुप्स मार्फत पुरग्रस्थांना मोलाची मदत

आर्ट ऑफ हेलपिंग फाऊंडेशन व सामाजिक फेसबुक ग्रुप्स मार्फत पुरग्रस्थांना मोलाची मदत

२०१९ प्रमाणे या वर्षीसुद्धा पावसाने महाराष्ट्रात चांगलाच थैमान घातला. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अतिवृष्टी, भूस्खलन, पूर, आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवित हानी झाली. या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या घटनांमध्ये १६० पेक्षा अधिक नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. Maharashtra rain and flood.

अतिवृष्टी, भूस्खलन, पूर, आणि ढगफुटीमुळे प्रभावित भागातील नागरिकांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. घर व रस्ते वाहून गेल्यामुळे या नागरिकांकडे जीवनावश्यक वस्तू सुद्धा उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. आणि काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी, तर काही ठिकाणे रस्तेच शिल्लक न राहिल्यामुळे बाहेरील मदत सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अशक्य होत होते.

अश्यात बऱ्याच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन पुरग्रस्थांसाठी मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यास सुरुवात केली.

या कठीण काळात जेव्हा सगळ्यांनाच अडचणींना समोर जावं लागत असतानासुद्धा माणुसकीला जपत नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली. आणि संस्थानांनी रस्ते सुरु झाल्यावर त्वरित मदत पोहोचवण्यास सुरुवात केली.

त्यातच पुण्यातील आर्ट ऑफ हेलपिंग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने आणि काही फेसबुक ग्रुप मधील तरुणांनी मदत गोळा करण्यास सुरुवात केली. थोडी का होईना पण तुम्ही मदत करा आणि इतरांना सुद्धा सांगा असे आव्हाहन करत त्यांनी ४ दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास १००० किलो पेक्षा जास्त धान्य गोळा केले.

Art of Helping Foundation delivered 150+ kits to flood affected areas.

मदत गोळा करून त्यातील धान्य साफ करून आणि ते दळून सर्वांनी १ परिवाराला देता येईल अश्या किट बनवण्यास सुरुवात केली. सर्वांच्या मेहनतीतून जवळपास १५० किट्स तयार करण्यात आल्या आणि एकूण ६ गावांमध्ये सोमवारी या किट्स चे वाटप करण्यात आले. प्रत्येक किट मध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, तिखट, हळद, डाळ, मीठ, मेणबत्ती, माचीस, आंगोळीचा व कपड्यांचा साबण, टॉवेल, बिस्कीट, व पाण्याची बाटली या वस्तूंचा समावेश होता.

मदतकार्याचा तपशील देणारा हा विडिओ नक्की बघा!

आर्ट ऑफ हेलपिंग फाऊंडेशन चे अध्यक्ष दीपंकर पाटील, सुरेख पाटील, समन्वयक वैष्णवी भुतडा, दीपक सुभेदार, प्रवीण काटकर, निखिल शिवाले, रामेश्वर बारस्कर. यांच्यासमवेत फेसबुक ग्रुप मराठा विकास प्रतिष्ठानच्या ऍडमिन टीम मधून कृष्णदेव बागल, पूनम जाधव, राहुल सावळे, योगिनी पिसाळ, संग्राम अळसुंडकर, नारायण लोभे. फेसबुक ग्रुप मराठा साम्राज्यच्या ऍडमिन टीम मधून चेतन शेवाळे या सर्वांनी प्रत्यक्षात येऊन हे कार्य पार पाडले. Art of Helping Foundation team.

लॉकडाऊन व प्रवासाच्या निर्भानधांमुळे ग्रुप मधील इतर सदस्यांनी प्रत्यक्षात न येतासुद्धा या कार्यासाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. सर्व सदस्यांनी वर्गणी आणि साहित्य गोळा करून या कार्यास मोठा हातभार लावला आणि त्यामुळेच हे कार्य पार पडले. फेसबुक ग्रुप छत्रपती मराठा साम्राज्य च्या पुणे टीम ने सुद्धा अखेरच्या क्षणाला एका विनंतीवर येऊन सर्व माल वाहण्यास खूप सहकार्य केले.

महाराष्ट्रातील तरुण कुठल्याही परिस्थितीला नेहमीच मदतीसाठी सज्ज असतात आणि महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यात पोहोचतात हे मात्र कौतुकास्पद आहे.

तरुणांच्या या माणुसकीला जपणाऱ्या कार्याला युनायटेड महाराष्ट्र टीम चा सलाम.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments