Sunday, June 26, 2022
No menu items!
Homeबातम्याआता Traffic पोलीस तुमची गाडी अडवणार नाही, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले नवीन...

आता Traffic पोलीस तुमची गाडी अडवणार नाही, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले नवीन आदेश, जाणून घ्या काय आहेत नवीन Traffic Rules नियम?

मुंबई पोलीस आयुक्त (CP) हेमंत नागराळे यांनी गुरुवारी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. पोलीस कमिशनर हेमंत नागराळे यांनी वाहतूक पोलिसांसाठी एक महत्वाचे परिपत्रक जरी केले आहे. या परिपत्रकामध्ये मुंबई पोलीस कमिशनर यांनी वाहतूक पोलिसांना वाहनांची विनाकारण तपासणी थांबविण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

Mumbai Police Commissioner Issues new order for traffic cops.

वाहतूक पोलिसांमार्फत विनाकारण वाहनांची व कागदपत्रांच्या तपासणीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे असे लक्षत येत असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत. मुंबईकरांना या नवीन नियमामुळे थोडाफार दिलासा नक्कीच मिळणार आहे. या नवीन आदेशामुळे वाहतूक पोलीस आता विनाकारण वाहने थांबवून कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली नागरिकांना त्रास देऊ शकणार नाही. Mumbai traffic cops new rules.

परिपत्रकात पोलीस आयुक्तांनी खालील मुद्दे मांडले आहेत.

  • मुंबई वाहतूक पोलीस फक्त वाहतुकीचे नियम मोडल्यावरच वाहनांना थांबवतील
  • वाहतुकीच्या हालचाली सुरळीत करणे यालाच मुंबई वाहतूक पोलिसांनीं प्रथम प्राधान्य द्यावे
  • गाड्यांची तपासणी करणे किंवा कागदपत्रांची तपासणी करणे हे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नाही

वाहतूक पोलिसांना फक्त मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार नियमांचे उल्लंघन केल्यावरच दंड आकारण्याचे अधिकार आहेत. याव्यतिरिक्त त्यांना वाहनचालकांकडून दंड किंवा कोणतेही शुल्क घेण्याचे अधिकार नाही. संशयाच्या आधारावर वाहने थांबविणे, त्यांची तपासणी करणे किंवा वाहनांचे कागदपत्रे तपासणे हे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नाही असे सुद्धा मुंबई पोलीस आयुक्त (CP) हेमंत नागराळे यांनी सांगितले.

Traffic cops can only stop vehicles if rules are broken.

“जरी स्थानिक पोलीस किंवा आरटीओ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त नाकाबंदी केलेली असेल तरी वाहतूक पोलिसांनी केवळ त्यांच्या कार्यावर लक्ष द्यावे. वाहतूक पोलिसांनी इतर कोणतीही तपासणी करू नये. आणि या आदेशाचे पालन होत नसल्याचे आढळल्यास संबंधित वाहतूक विभागाचे प्रभारी / प्रमुख यांना जबाबदार धरले जाईल.” असे सुद्धा या परिपत्रकात नमूद केले आहे.

Mumbai traffic cops to only focus on streamlining traffic and not checking documents.

“काही वाहतूक पोलीस वाहनांची व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वाहनांना रस्त्यातच थांबवतात असे आमच्या निदर्शनास आले आहे. आणि यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याबद्दल आम्हाला बऱ्याच तक्रारी सुद्धा आल्या आहेत. अशी तपासणी अनावश्यक आहे. आणि वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या हालचाली सुरळीत करण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे.” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम मोडल्यास थांबविण्याचे आणि आवश्यक असल्यास दंड आकारण्याचे अधिकार अजूनही वाहतूक पोलिसांकडेच आहेत.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments