Thursday, June 30, 2022
No menu items!
Homeक्रीडाऑलिम्पिकनीरज चोप्राच्या गोल्डन आर्म ने केली कमल, भारताला मिळवून दिले पाहिजे Athletics...

नीरज चोप्राच्या गोल्डन आर्म ने केली कमल, भारताला मिळवून दिले पाहिजे Athletics Olympic सुवर्णपदक

तो आला. त्याने पहिले. त्याने विजय मिळवला! Neeraj Chopra brings India a gold medal in athletics Olympics.

नीरज चोप्रा याने शनिवारी असे एक ध्येय साध्य केले आहे ज्याची भारताच्या इतिहासात मोठमोठ्या खेळाडूंनी कल्पना सुद्धा केली नव्हती. अगदी महान खेळाडू मिल्खा सिंग, पि टी उषा हे सुद्धा या ध्येयाच्या अगदी जवळ येऊन शेवटच्या क्षणाला हरले. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर नीरज चोप्रा यांनी आज इतिहास रचला. आजचा दिवसच वेगळा होता. सव्वाशे करोड जनतेच्या अशांना खांद्यावर घेऊन नीरज चोप्रा याने ऑलिम्पिक स्टेडियम मध्ये येऊन तो भाला ८७.५८ मीटर दूर फेकून अखेरच्या फेरी मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

हे सुद्धा वाचा: नेमबाजी: महिलांच्या 25 मीटर एयर पिस्टल इव्हेंटमध्ये राही सरनोबतने ISSF वर्ल्ड कप 2021 मध्ये सुवर्ण पदक जिंकले

विशेष म्हणजे नीरज चोप्रा याला भाला त्याच्या सुवर्ण हातातून सुटताच कल्पना अली होती कि त्याने इतिहास रचला आहे. नीरज ला पूर्णपणे आत्मविशास होता कि तो जिंकलेला आहे. आणि तो फक्त जिंकलाच नाही तर त्याने मैदानातील इतरांचे गुण सुद्धा निस्तेनाबूत केले. नीरज ने इतरांपेक्षा तब्बल ९१ सेन्टिमीटर पुढे भाला फेकला. आणि नीरजने त्याच्या दुसऱ्या बेस्ट फेरी मध्ये सुद्धा सिल्वर मेडल पेक्षा जास्त पॉईंट घेतले.

Neeraj Chopra creates history by winning gold in Athletics Olympic 2020.

नीरज च्या त्या अनोख्या खेळीमुळे नीरज याने १३ वर्षानंतर भारतात सुवर्णपदक आणले. नीरज याने स्वतःचे नाव इतिहासात तर लिहिलेच परंतु सर्व भारतीयांच्या मनात सुद्धा त्याने आदर मिळवला. भारताच्या इतिहासातील हे सुवर्णपदक कुठल्याही क्रिकेट वर्ल्ड कप पेक्षा खूप मोठे आहे याबाबत शंकाच नाही.

अखेर इतिहास रचला गेला आहे. नीरज चोप्रा भारताचा दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स पदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे. संपूर्ण राष्ट्राला नीरज चोप्रा यांचा अभिमान आहे.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments