Friday, July 1, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रनाशिकशासकीय विश्रामगृह चांदवड येथे चांदवड तालुका प्रहार ची बैठक: ८ ऑगस्ट

शासकीय विश्रामगृह चांदवड येथे चांदवड तालुका प्रहार ची बैठक: ८ ऑगस्ट

आठ ऑगस्ट रोजी वंदनीय राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रेरणेने तसेच आपली नाशिक जिल्ह्याची प्रहार ची तोफ गणेश निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रकाश (नाना) चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह चांदवड येथे चांदवड तालुका प्रहार ची बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये सर्व विषयांवर यथासांग चर्चा करण्यात आली. यामध्ये चांदवड तालुका प्रहार सदस्यांनी विविध योजनांची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत प्रहार चे कार्य कसे पोहोचेल तसेच अपंग दिव्यांग यांच्या समस्या सोडविण्यावर जास्त भर देण्यात आला. तसेच येणार्या पुढच्या काळात निवडनुकासाठी बांधनी करण्यात आली. बच्चू कडू यांचे विचार व काम तसेच योजना सामन्य माणसा पर्यतं पोहचवण्याची जबबदारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर टाकण्यात आली.

सुरेश तात्या ऊशीर यांची प्रहार तालुका सल्लागार पदी निवड करण्यात आली. संदिप महाराज यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली. तसेच गणेश तिडके व कैलास पगार यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. बापु भोकनळ यांची तळेगाव गटप्रमुख पदी निवड करण्यात आली .

गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट वकृत्व शैली ने सर्व प्रहार सैनिकांची मने जिंकली. तसे या प्रसंगी प्रहार चांदवड तालुका प्रमुख प्रकाश नाना चव्हान, शेतकरी संघटना तालुखा प्रमुख राम बोरसे प्रहार संपर्क प्रमुख शिवा गुंजाळ, रुग्णसेवक रेवन गांगुर्डे, कैलास पगार तसेच इतरही मान्यवरांची प्रबोधन महत्त्वाचे ठरले.

“सर्व प्रहार सैनिक यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यात दिसत होते. उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रहार सैनिक बैठकीत मग्न होता व सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम करण्याचा संकल्प केला. खूप खूप आनंद वाटला आजची बैठक म्हणजे एक प्रकारचे रसायन होते.” असे प्रहार च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये आज ज्या नियुक्त्या झाल्या त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व प्रहार सैनिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments