दि. ८ ऑगस्ट २०२१
रत्नागिरी जिल्ह्याला या वर्षी अभूतपूर्व पुराचा फटका बसला. अनेकांचे संसार होत्याचे नव्हते झाले, उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई, विरार, ठाणे, नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र मराठा क्रांती संघर्ष मोर्चा या व्यासपीठावर सर्व मराठा संघटना संघटनांनी एकत्र येऊन पुरग्रस्तांसाठी चिपळूण व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, कपडे, व इतर साहित्याची मदत साधारण 1500 लोकांना करण्यात आली.
चिपळूण परिसरातील बाजारपेठ, खेर्डी, दळवटने, पोसरे, मोरेवणे, मार्कंडी, पवन तलाव, वडनाका, कुंभरखाणी व कोयना परिसरातील मिरवाडी व इतर गावांना यावेळी प्रत्यक्ष भेट देऊन मदत देण्यात आली.
या वेळी शिवसंग्रामचे श्री विक्रांत आंब्रे, श्री हिंदुराव जाधव, श्री प्रफुल्ल पवार, श्री सुनील निकम, आणि इतर तसेच क्षत्रीय मराठा संघटनेचे श्री रुपेश मांजरेकर, श्री चंद्रकांत चाळके श्री.आनंद पाटील, श्री.संजय पाटील श्री जयसिंग खबाले मिलिंद चव्हाण आणि, जिद्दी मावळा संघटनेच्या श्रीमती पुनमताई पाटील, श्री कपिल गणात्रा, रंजना खुमाण, अश्विनी घाडगे, सेल्वी सिलम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ह्या मदत वाटपात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
त्याचबरोबर आमदार श्रीमती भरती लव्हेकर, श्री.राजन घाग सुनील खाड्ये, श्री विवेक सावंत, पुंडलिक मालुसरे, विजय राणे, सुजय पाटील, प्रकाश गावडे, नारायण गावकर, विजय मुळीक, हरी राऊळ, मंगेश घाग व इतर यांनी या कार्यात सहकार्य केले.
मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चा च्या या मदतकार्यात सहभागी झालेल्या संघटना आणि व्यासपीठ १) शिवसंग्राम, २) क्षत्रिय मराठा संघटन, 3)जिद्दी मावळा फाऊंडेशन ४) वी एम सावंत चॅरिटेबल ट्रस्ट ५) सकल मराठा समाज वसई विरार.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह न्यूज अपडेट्ससाठी आम्हाला Facebook आणि Twitter वर फॉलो करा. ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.